आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: संजय दत्तच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडने बनवले होते एक गाणे, समोर आला रेअर व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 90 च्या दशकात संजय दत्तचे नाव मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये आले होते. त्यावेळी त्याला टाडा केसमध्ये तुरुंगात जावे लागले होते. या काळात बॉलिवूड संजयच्या सपोर्टमध्ये उभे राहिले होते. संजयच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडने एक गाणेही तयार केले होते. हे गाणे अभिजीत भट्टाचार्य यांनी गायली होते.  'न देखो मुझे ऐसी नजर से..' असे या गाण्याचे बोल होते. या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संजय दत्त टेंशनमध्ये फिरताना दिसतोय. व्हिडिओमध्ये संजय कधी पोलिस कस्टडीमध्ये तर कधी कोर्टाबाहेर दिसतोय. व्हिडिओमध्ये राजेंद्र कुमार, यश जोहर, रिया पिल्लई त्याचा सपोर्ट करताना दिसत आहेत. याच काळात अजय देवगण, सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमारने 'संजू हम तुम्हा साथ है...' लिहिलेले पोस्ट हातात घेऊन संजयचा सपोर्ट केला होता. संजयचे आयुष्य नेहमीपासूनच कॉन्टोवर्शिअल राहिले आहे. डायरेक्टर राजकुमार हिरानीने त्याच्या कॉन्टोवर्शिअल आयुष्यावर 'संजू' हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. चित्रपटाने चार दिवसात फक्त भारतातच 145 कोटींची कमाई केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...