आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी देओल वरुण धवनला म्हणाला \'बच्चा\', तर भडकला फॅन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉबी देओल आणि वरुण धवन नुकतेच आयफा कॉन्फ्रेंसमध्ये पोहोचले होते. या इव्हेंटमध्ये बॉबी वरुण धवनला किड म्हणजेच 'बच्चा' म्हणाला. परंतू तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हे ऐकले आणि तो बॉबीवर भडकला. फॅन बॉबीला प्रश्न विचारत लगेच म्हणाला की, आजच्या घडीला वरुण सर्वात चांगल्या अभिनेत्यापैकी एक आहे आणि तुम्ही त्याला बच्चा म्हणत आहात. फॅनचा राग पाहून वरुण धवनने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही का एवढे चिडत आहात?


वरुणच्या फॅनला बॉबीने दिले उत्तर
- वरुण धवनच्या फॅनला उत्तर देत बॉबी म्हणाला की, - मला माहित आहे की, तुम्ही वरुणचे खुप मोठे फॅन आहात. पण मी त्याला बालपणापासून मोठे होत असताना पाहिले आहे. यामुळे तो माझ्यासाठी नेहमी बच्चाच राहणार आहे. बॉबी पुढे म्हणाला - तुम्ही जे म्हणत आहात, मीही तेच म्हणत आहे. एवढे यश मिळवूनही वरुण डाउन टू अर्थ आहे. तर तुम्हाला मी बोलतोय यामुळे का जलेस होतेय.


वरुणने केला डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
बॉबी बोलल्यानंतर वरुण धवनने त्याच्याकडून माइक घेतला आणि फॅनला म्हणाला की, बॉबी एवढे तरुण दिसतात, यामुळे तुम्हाला कन्फ्यूजन होत असेल. बॉबी एखाद्या टीनेजरप्रमाणे दिसत आहेत, यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाले असाल की, आम्ही एकाच वयाचे तर नाही. 
- बॉबी देओल 'रेस-3' चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तो सलमानसोबत शर्टलेस अवतारात दिसणार आहे.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...