आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: यामी गौतमने केला पोल डान्स, व्हिडिओ शेअर करत लिहिले- यासाठी वेडी आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम हिने सोशल मीडियावर आपला पोल डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. 'विक्की डोनर', 'बदलापुर' आणि 'काबिल' यांसारख्या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसली आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलेय की, "हे खुप अवघड आहे, परंतू मी यासाठी पागल आहे. पुन्हा हे करण्याची प्रतिक्षा करु शकत नाही." तिला पोल डान्सची आवड कशी निर्माण झाली याविषयी तिने काही दिवसांपुर्वीच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.


- यामीने सांगितले होते की, "फिटनेस आणि डान्सिंगच्या आवडमुळे मला पोल डान्सची आयडिया आली. मी हे एन्जॉय करतेय. आपला फिटनेस आणि डान्सवर काम करण्यासाठी पोल डान्सिंग सर्वात चांगली पध्दत आहे. यामुळे मी विचार केला की, हा चांगला वर्कआउट होऊ शकतो." यामी सध्या 'बत्ती गुल मीटर चालू' आणि 'उडी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे याचवर्षाच्या शेवटीपर्यंत रिलीज होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...