आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amir Look:'ओशो' चित्रपटासाठी केस काढणार आमिर खान, आलिया दिसणार 'मां आनंद शीला'च्या भूमिकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आमिर खान आध्यात्मिक गुरु आचार्य रजनीश म्हणजेच ओशोची भूमिका साकारणार आहे. 'ठग्स ऑफ हिन्दुस्तान' चित्रपटानंतर आमिर ओशोच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. सूत्रांनुसार या भूमिकेसाठी आमिर टक्कल करणार आहे. ज्यावेळी ओशो आपले टक्कल आणि पांढरे केस झाकण्यासाठी टोपी घायायचे तेव्हापासून चित्रपटाची कथा सुरु होणार आहे. यासाठी ओशोप्रमाणे दिसण्यासाठी आमिर आपल्या डोक्यावरील अर्धे केस कापणार आहे. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा चित्रपटातील लूक असू शकतो.


2019 मध्ये फ्लोरवर येणार चित्रपट...
रिपोर्ट्सनुसार 'ठग्स ऑफ हिन्दुस्तान' यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. आमिरचा पुढचा चित्रपट 'ओशो' 2019 मध्ये फ्लोरवर येण्याची शक्यता आहे. आमिर जास्तीत जास्त वेळ ओशोच्या भूमिकेसाठी देणार आहे. शकुन पात्रा या चित्रपटाचे डायरेक्शन करणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट दिसणार आहे. आलिया चित्रपटात ओशेची सेक्रेटरी मां आनंद शीलाच्या भूमिकेत दिसू शकते. आलिया सध्या आपल्या 'ब्रम्हास्त्र' आणि 'गली बॉय' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

 

कोण आहे ओशो...
ओशोचा जन्म मध्य प्रदेशमध्ये रायसेन जिल्ह्याच्या कुचवाडा गावात झाला होता. त्याचे मुळ नाव चंद्र मोहन जैन होते. 'ओशो' शब्द लॅटिन भाषेच्या ओशैनिक शब्दातून घेण्यात आला आहे. 'सागरात विलीन' असा त्याचा अर्थ आहे. तो आपल्या वडिलांच्या अकरा आपत्यांपैकी सर्वात मोठे होते. ओशो 7 वर्षे आपल्या अजोबांकडे राहिले. ते 7 वर्षांचे असताना त्यांच्या अजोबाचे निधन झाले आणि ते 'गाडरवाडा' येथे आपल्या आई-वडिलांकडे आले. 1960 च्या दशकात ते 'आचार्य रजनीश' च्या नावाने प्रसिध्द झाले. तर 1970-80 च्या दशात 'श्री रजनीश' नावाने प्रसिध्द झाले. 1989 मध्ये ते 'ओशो' नावाने प्रसिध्द झाले. 19 जानेवारी 1990 मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात ओशो यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...