आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरला एका रात्रीत सुपरस्टार बनवणारा डायरेक्टर 13 वर्षांपासून राहतो पहाडांमध्ये, करतो हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'कयामत से कयामत' या सुपरहिट चित्रपटातून आमिरला खानला एका रात्रीत सुपरस्टार बनला होता. या चित्रपटाचा डायटेक्टर आमिरचा चुलत भाऊ मन्सूर खान होता. मन्सूर खान दिर्घकाळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 1988 मध्ये 'कयामत...' मधून त्याने डायरेक्टर म्हणून पदार्पण केले होते. 2008 मध्ये त्याने प्रोड्यूसर म्हणून 'जाने तू...या जाने न' हा शेवटचा चित्रपट बनवला. परंतू आता मन्सूर कोठे राहतो हे तुम्हाला माहिती आहे का? 

 

साउथ इंडियामध्ये बिझनेस करतो मन्सूर
- मन्सूर जवळपास 15 वर्षांपासून तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्याच्या कुनूर विभागात राहत आहे. तो चीज बनवण्याचा व्यवसाय करतोय.
- परंतू चीजच्या व्यवसायासाठी मन्सूरने चित्रपट का सोडले? या प्रश्नाचे उत्तर एका मुलाखती दरम्याने त्याने दिले. मन्सूर सांगतो की, "हा निर्णय अचानक घेतलेला नाही. मला लहानपणापासूनच बिझनेस करायचा होता."
- मन्सूरने सांगितले की, "पनवेल(मुंबई जवळ) आमची काही जमीन होती. त्या जमीनीशी आम्ही खुप जोडले गेलो होतो. मी आणि माझी बहिण तिथे जायचो आणि हातांनी भेंडीचे झाडे लावायचो. मी अब्रॉडहून कोर्नेल आणि MIT पर्यंत गेलो, परंतू आतून आनंदी नव्हतो."
- "वडीलांनी (नासिर हुसैन) यांनी चित्रपटांमध्ये येण्याचा सल्ला दिला. तेव्हाही माझा प्रमुख उद्देश होता की, जमीनीशी जोडलेले राहावे. जोपर्यंत मला हवे तसे आयुष्य मिळत नव्हते, तोपर्यंत चित्रपट करत होते."
- "1979 के 1980 पर्यंत मी कॉर्नेल आणि MIT मध्ये राहिलो आणि नंतर MIT चे शेवटचे वर्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अलीबाग जवळ काही जमीन होती. सरकारला त्या जमीनीवर अधिग्रहण करुन एयरपोर्ट बनवायचे होते. त्यावेळी मला भूमि अधिग्रहण आणि याच्या अधिकारांविषयी माहिती मिळाली." 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मन्सूरच्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...