आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मोर्चा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी आमिर खान म्हणाला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता आमिर खानने आज वयाच्या 54 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आमिर आज दुपारी खास जोधपूरहून मुंबईत दाखल झाला. हा खास दिवस त्याने मीडियासोबत केक कापून साजरा केला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे पत्रकारांशी बोलताना आमिरने सांगितले. कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर जोधपूरहून आज मुंबईत पोहोचला. येथे आल्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमिरने अलीकडेच झालेल्या शेतकरी मोर्चाचा आवर्जून उल्लेख केला. सोबतच बिग बींच्या प्रकृतीविषयीचीही माहिती दिली.

 

शेतकरी मोर्च्याविषयी आमिर म्हणतो... 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत 180 किलोमीटर पायपीट करत हजारो शेतकरी 12 मार्च रोजी मुंबईत दाखल झाले होते. विविध मागण्यांसाठी या शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मोर्चा काढला होता, ज्याला सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. यावेळी आमिरने  या मोर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘शहरात राहणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे,’ असे आमिरने म्हटले. 

 

अमिताभ बच्चन यांनी केले सर्वप्रथम विश...
आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात आमिर खानसोबत अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. जोधपूर येथे हे दोघेही चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. सेटवर सर्वप्रथम बिग बींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे आमिरने यावेळी सांगितले.

 

बिग बींची प्रकृती आता उत्तम...
सोबतच बिग बींची तब्येत आता ठिक असल्याचेही तो म्हणाला. जोधपूरमध्येच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी आमिर खानसुद्धा तिथेच होता. ‘अमिताभ सरांच्या खांद्याला आणि पाठीला थोडी दुखापत झाली आहे. मात्र आता त्यांची तब्येत बरी आहे,’ अशी माहिती त्याने दिली.

 

बिग बींसोबत काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण...
आमिर पहिल्यांदाच बिग बींसोबत काम करतोय. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आमिर म्हणाला, "ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बींसोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे."

 

पुढील स्लाईड्सवर बघा, बर्थडे सेलिब्रेशन करतानाची आमिरची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...