आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सिक्रेट सुपरस्टार\' ने चीनमध्ये गाठले 750 कोटींचे शिखर, आमिर देणार पार्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाने भारतात मोठी कमाई केली होती. गेल्या महिन्यात हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्याता आला. चिनमध्येही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चीनमध्ये 750 कोटींची कमाई करुन एक मोठे शिखर गाठलेय. भारतापेक्षा चीनमध्ये या चित्रपटाने अनेक पटींनी जास्त कमाई केली आहे. चित्रपटाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाह मिळतो. चीनी चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमामुळे आमिर खुप खुश आहे. याच आनंदात आमिर खान चित्रपटाच्या संपुर्ण टीमला जंगी पार्टी देणार आहे. 

 

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला आमिरचा सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट 19 जानेवारीला चिनी चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला चीनी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. गेल्या महिन्यात हा चित्रपट आंतराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित झाला होता आणि अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटानं 174 कोटींची विक्रमी कमाई केली होती. हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होऊन 28 दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाला 750 कोटींचा गल्ला जमवण्यात यश आलं आहे. यापुर्वी आमिरच्या 'दंगल' चित्रपटानं 1,315 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने भारतापेक्षा अनेक पटींनी जास्त पैसे चीनमध्ये कमावले आहे. भारतात या चित्रपटानं फक्त 89 कोटींचा गल्ला जमवला होता.

 

आमिर हा चिनमध्ये प्रसिध्द आहे. यापुर्वी त्याचे 'थ्री इडियट्स' आणि 'पिके' हे दोन चित्रपटदेखील चीनमध्ये प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनीही तिथे चांगलीच कमाई केली होती. चित्रपटाच्या यशानंतर आमिरनं चित्रपटाच्या टीमला पार्टी देण्याचंही म्हटलं आहे. तो 21 फेब्रुवारीला टीमला पार्टी देणार असल्यास बोललं जातंय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा सिक्रेट सुपरस्टार चित्रपटाचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...