आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Thugs Of Hindostan' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लागले 200 कोटी, सर्वात जास्त खर्च अॅक्शन सीन्सवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: यशराज बॅनरच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जवळपास 200 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सूत्रांनुसार चित्रपटासाठी 18 व्या शतकातील भारताचा सेट बनवण्यात आला होता. चित्रपटासंबंधीत वेगवेगळ्या लोकांनी याविषयी सांगितले. सर्वात जास्त खर्च अॅक्शन सीन्सवर करण्यात आला. इटलीचे माल्टा, थायलँडमधील बँकॉक आणि भारतातील जोधपुर आणि गोव्याच्या मल्टीपल लोकेशन्सवर शूटिंग करण्यात आली.


देश-विदेशातून आले स्टंट परफॉरमर, बॉडी डबल
देश आणि विदेशातून जवळपास 45 स्टंट परफॉरमर, बॉडी डबल, फाइट कोरिओग्राफर आणि अॅक्शन डायरेक्टर हायर करण्यात आले होते. प्रोड्यूसर आदित्य चोप्राकडून चित्रपटात हवा तेवढा खर्च करण्याची परवानगी डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य यांना होती. त्यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले होते की, ग्लोबल लेव्हलचे अॅक्शन आणि एडवेंचर ड्रामा बनवायचा आहे. त्यांना मोठ्या पडद्यावर स्पेक्टरल फील द्यायचा होता. 


1857 ची कथा
1857 मध्ये यूपीच्या कासगंजच्या ठगांनी इंग्राजांविषयी बंड पुकारला होता. या सर्वांवर चित्रपटाची कथा आहे. ठग हे इंग्रजांवर निशाणा साधून संधी मिळताच त्यांना लुटत होते. सूत्रांनी याविषयी माहिती सांगितली. सर्वात जास्त अॅक्शन हे 'दंगल' गर्ल फातिमा सना शेखचे आहेत. तिला तलवारबाजी, घोडेस्वारी आणि भाल्यांसोबतच्या लढाईसाठी चार महिन्यांची ट्रेनिंग देण्यात आली होती. आमिर खानचे दोन महिन्यांचे शेड्यूल होते. 


बिग बींचा अँग्री मेन अवतार दिसणार
यासोबतच अमिताभ बच्चन यांनीही दोन आठवड्याची ट्रेनिंग घेतली आहे. सेटवरील लोकांनी सांगितले की, बिग बींनी स्वतःचे जास्तीत जास्त स्टंट स्वतःच केले आहेत. लोक त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पहिल्या अँग्री मॅन अवतारात पाहतील. 

 

या चित्रपटांचे होते सर्वात जास्त बजेट
बाहुबली-2 द कन्क्लूजन: 250 कोटी रुपये
पद्मावत : 215 कोटी रुपये
टायगर जिंदा है: 210 कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत...