आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर हेराफेरी, खिलाडी 420 चे दिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘फिर हेराफेरी’, ‘खिलाडी ४२०’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना मनमुराद हसवणारे, तर ‘मन’, ‘विरासत’, ‘रंगीला’ आणि ‘दौड’ या चित्रपटांमधून आपल्या उत्तम अभिनयाने सर्वांचे मन रिझवणारे ५४ वर्षीय अभिनेते नीरज व्होरा यांचे गुरुवारी पहाटे मुंबईत निधन झाले. 

 

सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षयकुमार, तुषार कपूर आदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नीरज व्होरा यांना हृदयविकाराचा झटका आला तसेच ब्रेन स्ट्रोकही झाला होता. त्या वेळी त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्या वेळी निर्माता फिरोज नाडियादवाला यांनी खास एअर अॅम्ब्युलन्सने नीरज यांना घरी आणले. गेल्या १० महिन्यांपासून नीरज व्होरा कोमातच होते.

 

नाडियादवाला यांनी आपल्या घरातच आयसीयू रूम तयार करून तिथे त्यांच्यावर वर्षभर उपचार सुरू ठेवले होते. गेल्या शुक्रवारी प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचे गुरुवारी पहाटे ४ वाजता निधन झाले. व्होरा हे फिरोज नाडियादवाला यांचे खास मित्र होते. त्यांची फिरोज यांनी अखेरपर्यंत नीट काळजी घेतली. व्होरा यांचे वडील पंडित विनायक व्होरा हे दिलरुबा वादक होते. त्यांच्याकडूनच नीरज यांना कलेचा वारसा लाभला होता. नीरज यांचा जन्म गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये झाला. त्यांची आई प्रमिलाबेन यांना चित्रपटांची अतिशय आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नीरज यांनी काही गुजराती नाटके लिहिली. त्यानंतर केतन मेहता यांच्या “होली’ चित्रपटात त्यांना अभिनय करण्याची पहिली संधी लाभली.  

 

दीर्घ आजाराने मालवली प्राणज्योत...

54 वर्षीय नीरज वोरा मागील 13 महिन्यांपासून कोमात होते. पाच दिवसांपूर्वी नीरज यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी मल्टी ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊ आणि मित्र हरवल्याची भावना फिरोज नाडियाडवाला यांनी व्यक्त केली. फिरोज नाडियाडवाला हे नीरज वोरा यांना सख्ख्या भावापेक्षा जास्त मानायचे. त्यांनीच नीरज यांचा अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळ केला होता. फिरोज यांनी त्यांच्या घरातील एका खोलीत आयसीयू कक्ष तयार करवून घेतला होता.

 

नीरज वोरा यांचा अल्पपरिचय... 

गुजरातमधील भूज येथे 1963 मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. नीरज यांना कलेची ‘विरासत’ वडील पंडित विनायक वोरा यांच्याकडून मिळाली. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते. नीरज यांच्या मातोश्री प्रमिला बेन यांना चित्रपटांची आवड होती. लहानपणी आईसोबत नीरज वोरा हे देखील चित्रपट पाहायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी गुजराती नाटकांसाठी लेखक म्हणून काम केले.  

 

आमिर खानसोबत केली होती करिअरची सुरुवात.. 

केतन मेहता यांच्या ‘होली’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली.  आमिर खान, आशुतोष गोवारिकर यांच्यासोबत नीरज यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. विनोदी भूमिकांसह त्यांनी विरासत, कंपनी या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. हॅलो ब्रदर, रंगीला, मन, पुकार, बादशहा, सत्या, मस्त, अकेले हम अकेले तूम, दौड या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. रंगीला या चित्रपटाचे संवाद नीरज यांनी लिहिले होते. तर गोलमाल या चित्रपटासाठी तुषार कपूरची निवडसुद्धा त्यांनीच केली होती.

 

बघा, लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...