आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Childhood Photos: बालपणी खोडकर होता अभिषेक, कुटूंबासोबत असे गेले बालपण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आज वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत अभिषेकचा जन्म झाला. तो दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांचा नातू आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन त्याच्या आई आहेत. अभिषेकच्या थोरल्या बहिणीचे नाव श्वेता बच्चन नंदा आहे.
2007 मध्ये माजी जगतसुंदरी ऐश्वर्या रायसोबत अभिषेकचे लग्न झाले आणि आता तो एका मुलीचा (आराध्या) वडील आहे. अभिषेक नेहमी आराध्यासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसणारा अभिषेक स्वतः बालपणी खूप खोडकर होता. इंटरनेटवर अभिषेकची बालपणीची अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिषेकचा मस्तीखोर अंदाज बघायला मिळतो.

अमिताभ यांनी एकदा खुलासा केला होता, की अभिषेक वयाच्या दुस-या वर्षापासूनच फनी डान्स करायला लागला होता. त्याचा तो फनी डान्स बघून त्यांना 'डॉन' सिनेमातील 'खईके पान बनारसवाला' या गाण्यावर परफॉर्म करण्याची प्रेरणा मिळाली होती. 


divyamarathi.com आज तुम्हाला अभिषेक बच्चनची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहे. यापैकी काही छायाचित्रांमध्ये अभिषेक आपल्या कुटुंबीयांसोबत एन्जॉय करताना आणि इतर काही छायाचित्रांमध्ये कॅमे-यासमोर पोज देताना दिसतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अभिषेक बच्चनचे बालपणीचे क्यूट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...