आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलर्सने लिहिले - अजूनही पालकांसोबत राहतो, अभिषेकने दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिषेक बच्चन मुंबईमध्ये पालकांसोबत राहतो. एका यूजरने त्याला ट्रोल करत ट्वीट केले की, आपल्या आयुष्याविषयी वाईट वाटू देऊ नको, लक्षात असू दे की, तु अजूनही आपल्या पॅरेंट्ससोबत राहतो. यावर अभिषेकने ट्रोलरला सडेतोड उत्तर देत लिहिले की, - हो मी माझ्या पालकांसोबत राहतो आणि ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मला त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळतेय. 


अजून काय बोलला अक्षय...
- अभिषेकने पुढे लिहिले - पालकांसोबत राहणे माझ्यासाठी सर्वात गर्वाची बाब आहे. तुम्हीही असे करुन पाहा, स्वतःविषयी चांगले फिल कराल. अक्षय शेवटच्या वेळी 'हाउसफुल 3' (2016) या चित्रपटात दिसला होता. आता तो 'मनमर्जिया' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत तापसी पन्नू काम करतेय.

 

पालकांसोबत जलसामध्ये राहतो अभिषेक...
अभिषेक बायको ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत 'जलसा' मध्ये राहतो. दोघांनी 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न केले होते. हे लग्न बच्चन कुटूंबियांच्या 'प्रतिक्षा' मध्ये झाली आणि रिसेप्शन ताज हॉटेलमध्ये झाले होते. लग्नाच्यावेळी ऐश्वर्या राय 33 वर्षांची होती आणि अभिषेकचे वय 31 होते. आज दोघांना 6 वर्षांची मुलगी आहे.


7 वर्षांत ऐश्वर्या-अभिषेकने 6 चित्रपट केले एकत्र
ऐश्वर्या आणि अभिषेकने 7 वर्षात  'ढाई अक्षर प्रेम के'(2000), 'कुछ ना कहो'(2003), 'बंटी और बबली'(2005), 'उमराव जान' (2005), 'धूम-2'(2006), आणि 'गुरु'(2007)  हे 6 चित्रपट एकत्र केले. तर लग्नानंतर दोघांचे 'सरकार राज'(2008) आणि 'रावन' (2010) हे चित्रपट रिलीज झाले आहेत. यानंतर ऐश्वर्या 'गुजारिश'(2010) मध्ये दिसली. परंतू नंतर पर्सनल आयुष्यावर फोकस करण्यासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. यानंतर ऐश्वर्याने 2015 मध्ये 'जज्बा' इंडस्ट्रीत कमबॅक केले. यानंतर ती  'सरबजीत' (2016) आणि 'ऐ दिल है मुश्किल' (2016) मध्ये दिसली. तर अभिषेक  'रावन' नंतर 'धूम-3', 'हॅप्पी न्यू ईयर', 'हाउसफुल-3' मध्ये दिसला परंतू त्याचे चित्रपट बॉक्सऑफिसवर धमाल करु शकले नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या-अभिषेकचे पालकांसोबतचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...