आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमान कोहलीच्या गर्लफ्रेंडने तक्रार घेतली मागे, लवकरच तुरुंगातून सुटण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता अरमान कोहलीची लिव्ह इन पार्टनर नीरु रंधावाने तिला मारहाण केल्याप्रकरणी अरमान कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर ९ दिवसांनी त्याला पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली होती. काल त्याला कोर्टात हजर करण्यात आले असून न्यायालयीन कोठावडी सुनावण्यात आली होती पण आता नीरूने ही तक्रार मागे घेतल्याचे कळते. 

 

क्षुल्लक कारणावरुन अरमान कोहलीने त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण केली होती. यानंतर नीरुने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आता नीरुने ही तक्रार मागे घेतली आहे त्यामुळे दोघे परस्पर समजुतीने हा वाद मिटवतील अशी शक्यता आहे. आता अरमानच्या जामिनासाठी वकिलांकडून मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अरमान कोहली आणि निरु रंधावाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...