आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Driver ची 12 वर्षांची भाची झाली किडनॅप, जॉन अब्राहम म्हणाला- 'चिंतेमुळे मी झोपू शकत नाहीये'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: जॉन अब्राहम हा सध्या खुप चिंतेत आहे. त्याचा ड्रायव्हर जितेंद्रची भाची नेहा दोन दिवसांपुर्वी किडनॅप झाली. जितेंद्रची 12 वर्षीय भाची नेहा आपल्या कुटूंबासोबत गुडगांवमध्ये राहते. शाळेत जाताना बस स्टॉप जवळ तिला किडनॅप करण्यात आले. तिचा शोध अजूनही लागलेला नाही. नेहाचे वडिल शशिकांत आणि स्वतः जितेंद्र तिचा शोध घेत आहेत. गुडगांवच्या ग्राम इस्लामपुरचे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. स्वतः जॉनसुध्दा पोलिसांच्या संपर्कात आहे. परंतू मुलीविषयी सध्या काहीच माहिती मिळालेली नाही.


जॉन म्हणाला - 'चिंतेमध्ये झोप येत नाही'

जॉनने मुंबईमध्ये आपला आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते' रिलीज संदर्भात मीडियासोबत बातचित केली. यावेळी त्याने किडनॅपिंगविषयी चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, 'जितेंद्र कडून मी नेहा गायब झाल्याचे वृत्त ऐकले तेव्हापासून मी डिस्टर्ब झालो आहे. गेल्या दोन रात्रींपासून मला झोप येत नाहीये. माझ्याकडून शक्य तितकी मदत मी जीतेंद्रला करतोय. आशा आहे की, मीडिया माझी मदत करेल.'

 

बातम्या आणखी आहेत...