आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: 300km पायी चालल्यानंतर सैटियागोमध्ये मिलिंद सोमनने अंकितासोबत दुस-यांदा थाटले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मिलिंद सोमन आणि अंकिता कंवरने पुन्हा एकदा लग्न केले आहे. यावेळी दोघांनी भारताबाहेर म्हणजेच पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये लग्न केले. मिलिंद आणि अंकिताने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहे. त्यांनी फोटोंना "जंगल में बहते हुए झरने के बीच शादी करने का सपना था।" असे कॅप्शन दिले आहे. मिलिंदने दुस-यांदा केलेल्या लग्नामध्ये दोघांचेही कुटूंब उपस्थीत होती. फोटोजमध्ये मिलिंद आणि अंकिता क्रिश्चियन वेडिंग लूकमध्ये दिसत आहेत. 


अफेअरच्या होत्या चर्चा
- अंकितासोबत लग्न करण्यापुर्वी मिलिंदचे अनेक अफेअर होते. सर्वात पहिले मिस इंडिया/मॉडल मधु सप्रेससोबत मिलिंदचे नाव जोडले गेले. '16 डिसेंबर' आणि 'जोडी ब्रेकर्स' मध्ये मिलिंदची को-अॅक्ट्रेस दिपानितासोबतही त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.
- 2005 मध्ये वृत्त होते की, मिलिंद हा अभिनेत्री गुल पनागला डेट करतोय. दोघांनी 'जुर्म' चित्रपटात एकत्र काम केले होते. परंतू एका मुलाखतीत मिलिंदने हे अफेअर स्पष्ट नाकारले होते.
- शहाना गोस्वामी आणि मिलिंद यांची पहिली भेट 2010 मध्ये झाली होती. दोघं मॅगझीनचे कव्हर आणि फॅशन इव्हेंट्समध्येही एकत्र दिसत होते. मिलिंद आणि शहाना रिलेशनशीपमध्ये असल्याचे मिलिंदने स्वतः कबूल केले होते. 


मागच्यावर्षी केला होता एक चित्रपट 
मिलिंद शेवटच्यावेळी 'शेफ'(2017) या बॉलिवूड चित्रपटात दिसला होता. मिलिंद सध्या फिटनेस प्रमोटर आहे. 1995 मध्ये अलीशा चिनॉयच्या  'मेड इन इंडिया' अल्बममधून डेब्यू केल्यानंतर त्याने  'कैप्टन व्योम' (1998-99) या मालिकेत काम केले होते. 
- त्याने 16 दिसंबर (2002), भेजा फ्राई (2007), भ्रम (2008), नक्षत्र (2010), डेविड (2013) 'बाजीराव मस्तानी'(2015), 'जुर्म'(2005) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

आसाम येथे राहणारी आहे अंकिता
अंकिताचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. ती आसामी वंशाची आहे आणि सध्या दिल्लीत राहते. 2013 मध्ये तिने एयर एशियामध्ये केबिन क्रू केबिन एग्जीक्यूटिव्ह म्हणून काम करणे सुरु केले होते.
- अंकिता आसामीसोबतच हिंदी, इंग्रजी, फ्रेंचसोबतच बंगाली भाषा बोलू शकते.

 

बातम्या आणखी आहेत...