आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Film:लेक सारासोबत चित्रपटात काम करणार सैफ अली खान, रिलेशनशीप ड्रामावर आधारित कथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सैफ अली खान सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये इंस्ट्रेस्ट घेतोय. 'फिल्मिस्तान' फेम डायरेक्टर नितिन कक्कड यांच्या चित्रपटातही तो दिसणार आहे. एका मुलाखती दरम्यान सैफने सांगितले की, 'नितिन आणि मी एक चित्रपटाविषयी बोललो आहे. हा चित्रपटाचा पहिला टप्पा आहे. स्क्रिप्ट चांगली आहे परंतू मी अजुन हे फायनल केलेली नाही.'


कॉमेडीसोबत देणार सोशल मॅसेज
दोघांनाही चित्रपटाची कथा आवडल्याचे बोलले जातेय. आता डेट्सविषयी बोलणे सुरु आहे. या चित्रपटाची कथा बाप-लेकीच्या अवती भोवती फिरते असे बोललो जातेय. हा एक कॉमिक चित्रपट आहे, ज्यातून प्रेक्षकांना सामाजिक संदेश मिळेल. हा चित्रपट जय शेवारमानी प्रोड्यूस करतील. जर सर्व काही ठिक असले तर सैफ आणि सारा या चित्रपटात एकत्र दिसतील.

 

'केदारनाथ'मधून सारा करतेय डेब्यू
सारा सध्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तिच्या 'केदारनाथ' चित्रपटाची शूटिंग आता संपली आहे. आणि आता पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. चित्रपट 30 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. तर दूसरा चित्रपट रोहित शेट्टीचा आहे. यामध्ये रणवीर सिंह तिचा हिरो असणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. हा चित्रपट 28 डिसेंबर 2018 ला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...