आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामल्याळम अभिनेता सिंधू आर पिल्लई याच्या मृत्यूने दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गोवा येथे त्याचा मृतदेह मिळाला आहे. गेल्या 12 जानेवारीपासून सिंधू गोव्यातच होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून समोर आले नाही पण पाण्यात बुडून तो मरण पावला असे सांगण्यात येत आहे.
सिंधूचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी आता पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, सिंधूवर केरळमधील त्याच्या थ्रिसूर या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सिंधूच्या मृत्यूची बातमी कळताच मल्याळम सुपरस्टार अभिनेता दलकर सलमानने एक ट्विट करत दु:ख व्यक्त केले. सिंधू आणि दलकर या दोघांनीही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. ‘सेकंड शो’ या चित्रपटात ते एकत्र झळकले होते.
सिंधू हा दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रातील एका मोठ्या कुटुंबातील मुलगा असून, मल्याळम चित्रपटसृष्टीत त्याचे वडिल पीकेआर पिल्लई हे एक मोठं नाव आहे. त्यांनी ‘चित्रम’, ‘वंदनम’ आणि ‘अमृतम गम्य’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सिंधू पिल्लईचे काही खास PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.