आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी अशी दिसत होती अनुष्का शर्मा, तिन्ही खानांसोबत दिल्या सुपरहिट फिल्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी वडिलांसोबत अनुष्का, वरच्या फोटोत भावासोबत तर खालच्या फोटोमध्ये आई आणि भाऊ कर्णेशसोबत अनुष्का. - Divya Marathi
लहानपणी वडिलांसोबत अनुष्का, वरच्या फोटोत भावासोबत तर खालच्या फोटोमध्ये आई आणि भाऊ कर्णेशसोबत अनुष्का.

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली येत्या 12 डिसेंबरला लग्न करणार असल्याने चर्चेत आहेत. हे दोघे इटलीतीन मिलान शहरात विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आहे. अनुष्काच्या फॅमिलीने त्यांच्या शेजाऱ्यांना लग्नाचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे. विराटनेही त्यांच्या दिल्लीतील काही मित्रांना निमंत्रित केले आहे. 

 

अनुष्काचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येत 1 मे 1988 ला एका आर्मी ऑफिसरच्या घरी झाला. अनुष्काचे वडील कर्नल अजयकुमार शर्मा आर्मीमध्ये ऑफिसर, तर आई आशिमा हाऊस वाइफ आहे. अनुष्काला एक मोठा भाऊ आहे, त्याचे नाव कर्णेश आहे. 

 

आर्मी स्कूलमध्ये झाले शिक्षण 
- अनुष्काचे प्राथमिक शिक्षण आर्मी स्कूलमध्ये झाले. बंगळुरु येथील माऊंट कारमेल कॉलेजमधून तिने ग्रॅज्युएशन केले. 
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का मुंबईत आली आणि मॉडेलिंग सुरु केली. 2007 मध्ये तिला मॉडेलिंगमध्ये पहिला ब्रेक मिळाला. त्यावेळी तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये वेंडेल रॉड्रिक्ससाठी मॉडेलिंग केले होते. 
- 2008 मध्ये आदित्य चोप्रा यांची फिल्म 'रब ने बना दी जोड़ी' द्वारे अनुष्काची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती. यामध्ये शाहरुख खान तिचा को-स्टार होता. करियरची पहिलीच फिल्म सुपरहिट ठरली होती. 

 

लव्ह लाइफमुळे राहिली चर्चेत 
- बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अनुष्काचे नाव बँड बाजा बारातचा तिचा को-स्टार रणवीर सिंहसोबत जोडले गेले होते. मात्र ही चर्चा लवकरच इतिहासजमा झाली. यानंतर तिच्या आयुष्यात आला विराट कोहली. जवळपास 4 वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. 
- विराटसोबतचे अनुष्काचे नाते नेहमीच हॅप्पी-हॅप्पी राहिलेली नाही. या दोघांमध्ये मध्यंतरी बेबनावही झाला होता. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्यानंतर त्याच दरम्यान ते दोघे एकत्र फिरतना दिसले होते. 

 

तिन्ही खानांसोबत केले काम 
- अनुष्काने बॉलिवूडमधील तिन्ही खान अर्थात शाहरुख, आमिर, आणि सलमान या तिघांसोबतही स्क्रिन शेअर केली आहे. 
- बॉलिवूडमधील डेब्यू फिल्मच अनुष्कान शाहरुखसोबत केली होती. 2014 मध्ये आमिर सोबत तिने 'पीके' फिल्म केली. त्यानंतर 2016 मध्ये सलमान खानसोबत 'सुल्तान'मध्ये तिने काम केले. विशेष म्हणजे या तिन्ही फिल्म सुपरहिट ठरल्या होत्या.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अनुष्काचे लहानपणचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...