आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Update:'मसान' फेम डायरेक्टर नीरजच्या चित्रपटात दीपिका पदुकोण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : गेल्या काही काळापासून दीपिका पुदकोण आपल्या चित्रपटांविषयी खुप चूजी झाली आहे. 'पद्मावत'च्या सक्सेसनंतर ती आपले चित्रपट निवडताना खुप जास्त सावधगिरी बाळत आहे. सूत्रांनुसार नीरज घेवणा यांच्या स्क्रिप्टने तिचे लक्ष वेधले आहे.
नीरजने यापुर्वी 'मसान' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यासोबतच 'गँग्स ऑफ वासेपुर' सारख्या चित्रपटात त्याने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. नीरज सध्या या स्क्रिप्टचे फर्स्ट ड्राफ्ट पुर्ण करण्यात व्यस्त आहे. स्क्रिप्ट पुर्ण होताच तो लगेच दीपिकाला यासाठी अप्रोच करणार आहे.


सध्या तो दीपिकासोबत या चित्रपटाविषयी चर्चा करत आहे. दीपिकाला ही स्क्रिप्ट पसंत येतेय. तिने अजुन हा चित्रपट साइन केलेला नाही. चित्रपटाविषयी अजून डिस्कशन सुरु आहे. या वुमन सेंट्रिक चित्रपटात दीपिका प्रमुख भूमिका साकारणार आहे. 


बॅलेन्स बनवतेय दीपिका

दीपिकाला वाटते की, तिच्या करिअरमध्ये कमर्शिअल आणि आउट ऑफ बॉक्स चित्रपटांमध्ये बॅलेन्स असावे. 2014 मध्ये तिने 'हॅप्पी न्यू ईयर'सोबतच 'फाइंडिंग फॅनी' केला होता. तर यासोबतच तिने 'पीकू'सोबतच 'बाजीराव मस्तानी'सारखा चित्रपट केला होता. तसेच या वर्षीचा सर्वात हिट चित्रपट 'पद्मावत' केल्यानंतर तिने विशाल भारव्दाजचा चित्रपट साइन केला. 

 

अजून अनाउंसमेंट झालेली नाही
दीपिकाने आपल्या पुढच्या चित्रपटांची निवड केली आहे. परंतू अजुनही तिने चित्रपटाची ऑफिशिअलरी अनाउंसमेंट केलेली नाही. सूत्रांनुसार ती सध्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. आता ती जो चित्रपट साइन करेल त्याची शूटिंग आपल्या लग्नानंतरच करेल. दीपिकाने नीरजा चित्रपट साइन केला तर हा चित्रपट पुढच्या वर्षी फ्लोरवर येईल. यापुर्वी ती विशाल भारव्दाजचा चित्रपट पुर्ण करेल.

बातम्या आणखी आहेत...