आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोहब्बते\' फेम किम शर्मावर मोलकरणीने लावला मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'मोहब्बते' चित्रपटाची अभिनेत्री किम शर्मावर तिच्याच मोलकरणीने मारहाण करण्याचा आणि पगार न देण्याचा आरोप लावला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, एस्थर खेस किमच्या घरात 27 एप्रिलपासून काम करत होती. यावेळी 21 मे रोजी एस्थर कपडे धुत होती. त्यावेळी लाइट आणि डार्क कलरचे कपडे ती वेगवेगळे करायचे विसरली. याच कारणांमुळे किमने एस्थरला मारहाण केली आणि नंतर तिला नोकरीवरुन काढून टाकले. यासोबतच एस्थरने किमवर पगार न दिल्याचा आरोप लावला आहे. 


किम म्हणाली - तिने माझे 70 हजारांचे कपडे खराब केले
तर दूसरीकडे, किमने सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की, मी तिला मारले नाही. तिनेच माझे 70 हजारांचे कपडे खराब केले. तिने असे केले तेव्हा मी तिला बाहेर निघून जाण्यास सांगितले. पगार न देण्याविषयी किम म्हणाली की, ती प्रत्येक महिन्यात 7 तारखेला सॅलरी देते. याविषयी मी एस्थरला सांगितले होते.

 

27 जूनला मोलकरणीने केली तक्रार
याविषयी मोलकरीण एस्थरने खार पोलिस स्टोशनमध्ये किम शर्माविरुध्द 27 जूनला तक्रार दाखल केली होती. किम विरुध्द आयपीसी कलम 323(मारहाण आणि जख्मी करणे) आणि 504(जाणिवपुर्णक अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस्थरचा आरोप आहे की, पोलिसांनी अभिनेत्री विरोधात कोणताही सनम जारी केलेला नाही. तिच्या कम्प्लेंटचे स्टेटसही तिला सांगण्यात आलेले नाही. 

 

कोण आहे किम शर्मा...
- किम जाहिरातींमध्ये काम करायची. त्याच काळात आदित्य चोप्राची नजर तिच्यावर पडली. आदित्यने तिला 'मोहब्बतें'(2000) मधून पहिला ब्रेक दिला. 'मोहब्बते'नंतर किम अनेक चित्रपटात दिसली. परंतू तिचा चित्रपट प्रभाव पाडू शकला नाही.
- किमचे पहिले अफेअर 2003 मध्ये क्रिकेटर युवराज सिंहसोबत होते. 4 वर्षे दोघांचे नाते सुरु होते. नंतर 2007 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर किमने स्पेनिश बॉयफ्रेंड कोर्लोस मार्टिनला डेट केले. परंतू नंतर त्याचे ब्रेकअप झाले.
- 2010 मध्ये किम शर्माने केन्या येथे राहणारा बिझनेसमन अली पुंजानीसोबत मोम्बासामध्ये लग्न केले. परंतू 7 वर्षांनंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. अली पहिलेच विवाहित होता आणि तीन मुलांचा पिता होता.
- 2017 मध्ये फॅशन डिझायनर अर्जुन खन्नासोबत किम शर्माचे अफेअर चर्चेत होते. अर्जुन खन्नाही पहिलेच विवाहित आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...