आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Desi Girl प्रियांका 'भारत' चित्रपटासाठी घेणार नाही मानधन, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. आपल्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत आहे. ती काही काळापासून 'क्वांटिको' च्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. ही शूटिंग संपवून ती आता भारतात परतली आहे. हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार आहे. ती लवकरच 'भारत' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर आता प्रियांकाचे मानधन वाढल्याचे बोलले जात होते. ती 'भारत' या चित्रपटासाठी 14 कोटी रुपयांचे मानधन घेणार असेही वृत्त होते. बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणा-या मानधनापैकी हे सर्वात मोठं मानधन मानलं जात होती. परंतू आता वृत्त आहे की, प्रियांका चोप्रा कोणतेही मानधन न घेता 'भारत' या चित्रपटात काम करणार आहे.

 

यामुळे घेणार नाही मानधन
'भारत' या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर हे करणार आहेत. प्रियांका आणि अली अब्बास यांची चांगली मैत्री आहे. याच कारणांमुळे प्रियांच्या त्यांच्या चित्रपटात मोफत काम करणार असल्याचे वृत्त आहे. बिग बजेट सिनेमात प्रियांका मोफत काम करणार असल्याचं ‘बॉलिवूड हंगामा’नं म्हटलं आहे. मानधन न घेता मोफत काम करणारी प्रियांका बॉलिवूडमधली काही पहिली अभिनेत्री नाही याआधी सलमान, करिनानं देखील मानधन न घेता काम केलं होतं. 

बातम्या आणखी आहेत...