आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या चाळीशीत तिसऱ्यांदा Pregnant आहे सलमानची हिरोईन, कधीकाळी होणार होता घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानसोबत नव्वदच्या दशकात 'बंधन' आणि 'जुडवा' यांसारख्या हिट चित्रपटांत काम केलेली रंभा पुन्हा एकदा चर्चेत आहे.  याचे कारण म्हणजे रंभा वयाच्या 39 व्या वयात तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली आहे. रंभाने सोशल मीडीयावर बेबी बंपसोबत तिचे फोटोही शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना रंभाने लिहीले की, "मी ही गुडन्युज तुम्हा सर्वांसोबत शेअर करु इच्छिते. मी प्रेग्नेंट आहे आणि आता तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे." बेबी बंपसोबत फोटो शेअर करताना फार आनंद होत असल्याचे ती म्हणते. 

 

तिने लिहीले, "मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा." रंभा सध्या दोन मुलींची आई आहे. रंभाच्या मुलींचे नाव लाण्या आणि साशा आहे. लाण्या 7 तर साशा 4 वर्षाची आहे.

 

लग्नानंतर कॅनडाला शिफ्ट झाली रंभा..
रंभाने 2010 साली बिझनेसमन इंद्रन पद्मनाथनसोबत लग्न केले आणि कॅनडाला शिफ्ट झाली. मागच्या वर्षी रंभाचे लग्न तुटण्याच्या मार्गावर होते तिच्या पतीने कोर्टात केसही दाखल केली होती पण काही दिवसानंतर बातमी आली की दोघांमधील वाद संपुष्टात आला आहे. हा वाद संपवण्यासाठी दोघांनी काउंसलिंगचा आधार घेतला. रंभाने आतापर्यंत तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या 100 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

 

करिअरकाळात केले 100 चित्रपट..
रंभाने तिच्या करिअरकाळात जवळपास 100 चित्रपट केले. 90च्या दशकात रंभा सेंसेश्नल स्टार होती. ती एक उत्कृष्ट डान्सरही आहे. सलमान खानसोबत असलेला जुडवा हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. रंभा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे आणि नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.

 

हुंड्यामुळे छळाचा वहिनीने केला होता आरोप...
2014 साली रंभाच्या भावाची पत्नी पल्लवीने रंभावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता आणि बंजारा हिल्स पोलीस स्टेशन, हैदराबाद येथून रंभाला समन्सही मिळाले होते. यावेळी रंभाचा भाऊ श्रीनिवास राव, वडील वेंकटेश्वर राव आणि उषा रानी यांच्यावरही पल्लवीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. रंभा कॅनडात राहत असल्याने तिच्यापर्यत पोहोचणे पोलिसांना कठिण झाले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रंभाचे तिच्या कुटुंबासोबतचे काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...