आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Renuka Shahane Shared Furious Post About Not Padmavat But What To Ban In India

\'पद्मावत\' मुद्द्यावर संतप्त झाली ही मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली चित्रपट नाही, \'या\' गोष्टी करा बॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरुन एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या संपूर्ण देशभरात पद्मावत विरुद्ध करणी सेना अशी जंग छेडली गेली आहे. 'पद्मावत' रिलीज होऊ नये यासाठी करणी सेनेचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीतील लोकांचे प्रतिनीधीत्व करत रेणुका शहाणे यांनी पद्मावत नव्हे तर स्त्रीभ्रुण हत्या, महिलांची छेडछाड, बलात्कार या गोष्टींना बॅन करण्याची देशाला गरज असल्याचे सांगितले. 

 

रेणुका शहाणे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या अतिशय गंभीर दिसत आहेत. त्यांनी हातात तीन पोस्टर घेतले आहेत आणि त्यावर Ban rape, Ban Female Foticide, Ban Sexual molestation लिहीले आहे. रेणुका यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेणुका शहाणे यांनी शेअर केलेली पोस्ट...

बातम्या आणखी आहेत...