आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिता भादुरींवर बहिणीच्या मुलीने केले अंत्यविधी, अंत्यसंस्काराला पोहोचले फक्त 5 कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रिता भादुरी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले. अंधेरी चकाला येथील पारशिवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या बहिणीची मुलगी मिनी हिने त्यांच्यावर अंत्यविधी केले. विशेष म्हणजे 44 वर्षे इंडस्ट्रीत काम करणा-या रिता भादुरींना अखेरचा निरोप द्यायला सतीश शाह, जया भट्टाचार्य, टिकू तलसानिया, शिशीर शर्मा, परितोष साध हे कलाकार वगळता इंडस्ट्रीतील इतर कुठलाही कलाकार पोहोचला नाही.  रिता भादुरी या अविवाहित होत्या आणि बहिणीच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला होत्या. 

 

अलीकडच्या काळात त्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'निमकी मुखिया'मध्ये इमरती देवीच्या भूमिकेत झळकल्या होत्या.  रिता भादुरी या अनेक मालिका आणि चित्रपटांतील प्रसिद्ध कलाकार होत्या. त्यांच्या निधनाची माहिती ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली. रिता भादुरी यांच्या निधनाची माहिती देताना त्यांनी लिहिले की, 'अतिशय दु:खाने सूचना देत आहे की, रिता भादुरी आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच 17 जुलै रोजी 12 वाजता अंधेरी ईस्ट, मुंबईमध्ये अंत्य संस्कार केले जातील. आपल्या सर्वांसाठी त्या आईसारख्या होत्या. त्या कायम आपल्या आठवणीत राहतील...'

 

किडनी विकाराने होत्या त्रस्त?

मागच्या अनेक दिवसांपासून रिता यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना किडनीचा त्रास होत होता. यामुळेच त्यांना एका दिवसाआड डायलिसिससाठी जावे लागायचे. प्रकृती चांगली नसूनही रिता शूटिंग करत होत्या, सेटवर जेव्हा त्यांना वेळ मिळायचा, त्या आराम करायच्या.

 

प्रकृती गंभीर असूनही सोडले नाही काम

रिता भादुरी यांची खराब प्रकृती आणि कामासाठी त्यांची आस्था पाहून टीवी मालिका निमकी मुखियामध्ये त्यांना त्यांच्या सवडीप्रमाणे शूटिंग शेड्यूल ठेवण्यात आले होते. एकदा रिता भादुरी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, 'म्हातारपणात होणाऱ्या आजारांच्या भीतीने काम करणे सोडणार नाही. मला काम करणे आणि व्यग्र राहणे पसंत आहे. मला कायम माझ्या बिघडलेल्या प्रकृतीबाबत विचार करणे आवडत नाही. यामुळे मी स्वत:ला नेहमी व्यग्र ठेवते. मी खूप नशीबवान आहे की, मला एवढ्या सपोर्टिव्ह आणि समजदार कास्ट- क्रूसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.'

 

पुढील स्लाईड्सवर बघा, रिता भादुरी यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...