आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : पाकिस्तानात अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निघृण हत्या त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान पेटला आहे. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पाकिस्तानी असल्याने तिला जगाकडून आलेले अनुभव तिने शेअर केले. ते अनुभव सांगताना तिला अश्रू अनावर झाले.
काय म्हणाली सबा...
हा व्हिडिओ 'एक नई सुबह विद फराह' शो चा आहे. ज्यात सबा कमरने अलीकडेच हजेरी लावली होती. यात ती चक्क रडत सांगतेय, की पाकिस्तानी असण्याचे दुःख काय आहे. त्यात ती म्हणते, ''पाकिस्तान जिथे पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा केल्या जातात. पण जेव्हा आम्ही परदेशात जातो आणि ज्याप्रकारे आमची चेकींग केली जाते, ते मी सांगूच शकत नाही. जेव्हा एक एक गोष्ट चेक केली जाते तेव्हा खूप लाज वाटते.''
जेव्हा एअरपोर्टवर अडवले गेले...
या मुलाखतीत ती पुढे म्हणाली की, ''मला अजूनही आठवतेय, जेव्हा मी शूटींगसाठी टिबलिसीला गेले होते. माझ्यासोबत असलेले क्रू भारतीय होते. त्या सर्वांना सोडले आणि मला थांबवून ठेवण्यात आले. कारण माझा पासपोर्ट पाकिस्तानचा होता. माझे इन्वेस्टिगेशन झाले, मुलाखत झाली आणि त्यानंतर मला सोडण्यात आले. त्या दिवशी मला आपल्या इज्जतीची, पोजीशनची जाणीव झाली. आपले जगात काय स्थान आहे हे मला त्या दिवशी कळले.''
पुढे वाचा, 6 वर्षीय जैनब बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बोलत होती सबा..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.