आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday : या अभिनेत्रीच्या सौंदर्याला भूरळून अभिनेते विसरायचे त्यांचे डायलॉग्ज..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'चौदवी का चाँद' हे गाणे ऐकले की आपल्या डोळ्यासमोर येतो वहिदा रहमान यांचा देखणा चेहरा आणि बोलके डोळे. कुठल्याच प्रकारे कोणतेही अभिनयाचे शिक्षण न घेता चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले अढळ असे स्थान निर्माण केले आहे. वहिदा रहमान आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहे. 3 फेब्रवारी 1936 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती सांगणारे हे पॅकेज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

- असे म्हणतात, की वहिदा इतक्या देखण्या होत्या की चित्रपटाच्या शूटवेळी त्यांचे सौंदर्य पाहून त्यांचे अभिनेता बऱ्याचदा डायलॉग्जही विसरुन जात 
- वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत आई आणि प्रेमिका या दोन्ही भूमिका केल्या आहेत. 'अदालत' (1976) चित्रपटात प्रेमिका आणि 'त्रिशूल' (1978) चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका केली आहे.
- वहिदा रहमान गुरु दत्त यांना त्यांचा मेंटॉर मानतात. गुरु दत्त यांनी वहिदा यांना 'गाईड' चित्रपटात दिलेला ब्रेक वहिदा रहमान यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. 
- वहिदा यांना चित्रपटात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना डान्सची फार आवड होती. तेलुगु चित्रपट ‘Rojulu Marayi’ चित्रपटात त्यांनी थोड्याच वेळासाठी डान्स केला होता. 
- वहिदाजी यांना 3 वेळेस फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 
- 1966 साली 'गाईड' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार, त्यानंतर 1968 साली 'नीलकमल' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार आणि 1994 मध्ये त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले.

- 1971 साली वहिदा रहमान यांना 'रेश्मा और शेरा' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला होता. 1972 साली त्यांना 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आले. 2006 साली त्यांना NTR नॅशनल अवॉर्ड तर 2011 साली 'पद्म भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वहिदा रहमान यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...