आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला ठेंगणे बनवण्यासाठी खर्च होत आहेत 70 कोटी, 400 लोक दिवस रात्र करत आहेत काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खान सध्या झिरो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो 27 एप्रिलपासून पुर्ण टीमसोबत अमेरिकेत आहे. अधुन मधून तो दुबई आणि भारतात येत राहतो. अमेरिकेच्या अलाबामा आणि हंट्सविलेमध्ये शूटिंगनंतर सध्या सर्व लोक ओरलँडमध्ये आहेत. चित्रपटासंबंधीत सूत्रांनुसार 'झिरो' हा शाहरुख खानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामध्ये तो ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. त्याला या अवतारात दाखवण्यासाठी VFX म्हणजेच व्ह्यूजुअल इफेक्ट्सवर खुप पैसा खर्च करण्यात आला आहे.

 

400 इनहाउस वीएफएक्स सुपरवायजर करत आहेत 'झिरो' च्या VFX वर काम...

- शाहरुखची कंपनी रेड चिलीजने झिरो चित्रपटात शानदार इफेक्ट्स आणण्यासाठी 400 इनहाउस VFX सुपरवायजर लावले आहेत.
- यासोबतच अमेरिकाचे मोठ्या स्टूडिओजचे VFX एक्सपर्टही आउटसोर्स केले आहेत.
- टीमसंबंधीत लोकांनी सांगितले की, फक्त VFX वर 70 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहे. अशा प्रकारे हा चित्रपट 'बाहुबली' नंतर VFX च्या बाबतीत दूसरा सर्वात जास्त महागडा चित्रपट ठरणार आहे. कारण याचे VFX बजे 85 कोटी रु. होते.
- शाहरुखने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, "व्हिज्यूअल इफेक्टच्या बाबतीत हा फक्त भारतातील सर्वात अडवांस्ड चित्रपट नाही तर जगभरातील सर्वात अडवांस्ड चित्रपट आहे. दोन वर्षांपुर्वी याचे व्हिज्यूअल इफेक्ट डिझाइन केले गेले होते. हा चित्रपट लोकांना वेगळा व्हिज्यूअल इक्सपीरिएन्स देईल."
- शाहरुख खानच्या 'रा-वन' चित्रपटासाठी 300 VFX सुपरवायजरने काम केले होते.


भारतात साजरी करणार ईद
- अमेरिकेत काम करणा-या टीमच्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुख ईदला सर्वांना सुट्टी देणार आहे.
- चित्रपटाची शूटिंग 18 जूनपर्यंत होणार होती. पण आता वृत्त आहे की, पुर्ण टीम 13 जूनला भारतात परतणार आहे.
- कारण शाहरुख ईद साजरी करण्यासाठी मुंबईत येणार आहे. ईदच्या दिवशी चित्रपटाचा अजून एक व्हिडिओ रिलीज केला जाईल. चित्रपटाचा पहिला व्हिडिओ फेब्रुवारीमध्ये रिलीज केला गेला होता.

बातम्या आणखी आहेत...