आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच अरमानच्या घरी पोहोचली नीरु, राहावे लागतेय हॉटेलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बिग बॉसचा एक्स कंटेस्टेंट अरमान कोहलीने काही दिवसांपुर्वीच गर्लफ्रेंड नीरु रंधावाला मारहाण केली होती. नीरुच्या डोक्याला जखम झाल्यामुळे तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करण्यात आले होते. आता नीरुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार येथून डिस्चार्ज होताच नीरु सरळ अरमान कोहलीच्या घरी पोहोचली आणि आपले सर्व सामान घेऊन त्याच्या घरातून निघून गेली. सध्या नीरु एका हॉटेलमध्ये थांबली आहे.
नीरु जेव्हा अरमान कोहलीच्या घरी पोहोचली तेव्हा अरमानची आई निषी कोहली तिच्यासोबत जास्त बोलल्या नाहीत. पण नीरु घरातून बाहेर निघताना अरमानचे वडील राजकुमार कोहली इमोशनल झाले आणि त्यांनी नीरुची गळाभेट घेतली. अरमानच्या घरासंबंधीत जवळच्या सोर्सेजनुसार, अरमानच्या वडील नीरुला म्हणाले की - एवढा गोंधळ होण्यापुर्वी माझ्यासोबत काही शेअर केले असते, तर असे झाले नसते. ते म्हणाले- बाळा तुझी परिस्थिती मी समजू शकतो. 


मेसेजमध्ये असा बोलला अरमान कोहली
मेसेज पाठवत अरमान म्हणाला - नीरु, तुला तुझ्या आईची शपथ आहे, प्लीज मला एकदा कॉल कर. मला खरचं तुझ्यासोबत महत्त्वाचे बोलायचे आहे. कमीत कमी एकदा माझ ऐक. माझ्या वडिलांनी तुला 3-4 वेळा फोन केला. जर ते तुझी काळजी करत नसते तर वारंवार फोन का लावला असता. नीरु, आय लव्ह यू, माझी आई तुझ्यावर प्रेम करते... कमीत कमी त्यांचा तर विचार कर. तु परत ये, आपण याच आठवड्यात लग्न करु.

 
यामुळे अरमानने नीरुला केली मारहान
गोव्यामध्ये अरमानचा एक बंगला आहे, ज्याचे मॅनेजमेंट नीरु पाहत होती. हा बंगला रेंटवर दिला जातो. अनेक वेळा क्लाइंट रेंटचे पेमेंट तेथील स्टाफला देते. परंतू तरीही याच्या पैशांविषयी अरमान मला विचारत होता. मी त्याला बोलले - मी त्याला म्हणाले की, मी स्टाफला विचारुन सांगते, तर तो मला शिव्या देऊ लागला. मी काही विचार करण्यापुर्वीच त्याने माझे केस पकडून डोके फरशीवर आदळले. मी पोलिसांना काही सांगू नये या अटीवर तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

बातम्या आणखी आहेत...