आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध गायक उदित नारायण रुग्णालयात दाखल, या आजारावर सुरु आहेत उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायक उदित नारायण - Divya Marathi
गायक उदित नारायण

मुंबईः प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय उदित यांना यूरिन इन्फेक्शन आणि हाय डायबिटीजच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


गेल्या महिन्यातही होते रुग्णालयात दाखल... 
- सूत्रांच्या माहितीनुसार, उदित नारायण यांना डायबिटीज आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या रक्तातील ग्लुकोज लेवल वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- डायबिटीजसोबतच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. शिवाय त्यांना यूरीन इन्फेक्शनचाही त्रास सुरु झाला आहे.
- उदित यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायणला सोमवारी (12 मार्च) ऑटोरिक्षाला धडक दिल्याप्रकरणी अटक झाली होती. या अपघातात ऑटो चालक आणि रिक्षातील प्रवासी महिला जखमी झाले होते. अटक झाल्यानंतर 10 हजार रुपयांच्या जामीनावर आदित्यला सोडण्यात आले होते. 

 

उदित यांनी निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख...

- उदित नारायण यांना 2009 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
- सुमधूर आवाजासाठी उदित यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट गायक म्हणून त्यांनी 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावी केला. 
- 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'आशिकी', 'लगान' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. उदित यांनी आतापर्यंत  30 भाषांमध्ये सुमारे 15 हजारांहून अधिक गाणी स्वरबद्ध केली आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, उदित नारायण यांचे पत्नी आणि मुलासोबतचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...