आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After The Social Thriller Pink, Tapsee Will Be In The Crime Thriller Along With Big B

सोशल थ्रिलर पिंकनंतर क्राइम थ्रिलरमध्ये दिसणार तापसी, सोबत असतील बिग बी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्पॅनिश चित्रपट कॉन्ट्राटिएम्पोचा ऑफिशिअल रीमेक तयार होत आहे. हा चित्रपट द इनव्हिजिबल गेस्टच्या नावाने ओळखला जातो. हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर होता. डायरेक्टर सुजॉय घोष या चित्रपटाचे डायरेक्ट करतील. त्यांनी विद्या बालन स्टारर कहानी आणि कहानी 2 डायरेक्ट केला होता. या चित्रपटात पिंक चित्रपटाप्रमाणेच अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसतील.

 

एक्सायडेट आहे तापसी
- तापसीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी खुप उत्साहित आहे. दोन वर्षात हा तिचा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा दूसरा चित्रपट आहे.
- चित्रपटाचे टायटल बदललेले असणार आहे. परंतू यामध्ये ती एका पावरफुल महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

नीतिशस्त्रमध्ये दिसली होती
- तापसी बॉलिवूडमध्ये अनेक चॅलेंजिंग रोल करते. तिने नुकताच नीतिशास्त्रा नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. यामध्ये ती एका सेल्फ डिफेंस इंस्ट्रक्टरच्या भूमिकेत दिसली होती.
- 4 जूनला यूट्यूबवर रिलीज झालेल्या चित्रपटाविषयी तापसी म्हणाली होती की, हा पिंक आणि नाम शबानाचा कॉम्बो आहे. डायरेक्टर कपिल वर्माने हे एका फ्रेममध्ये आणून सेट केले होते.

 

तेलुगुमध्ये नीवेवारु पुढचा चित्रपट
- तापसी तेलुगू चित्रपटातही सक्रिय राहते. तिने 2010 मध्ये तेलुगू चित्रपट 'झुम्मंडी नादम' मध्ये अॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. यानंतर तिने याच भाषेत  'सहसम', 'दोंगाता', 'द गाजी अटैक', 'गुंडेल्लो गोडारी' आणि 'मोगुडू' चित्रपटात अभिनय केला.
- नीवेवारु तापसीचा 8 वा तेलुगू चित्रपट आहे. यामध्ये तिच्यासोबत पिनेसेट्टी आणि रीतिका सिंह आहेत. यासोबतच निन्नू कोरी चित्रपटात काम केलेला अभिनेता नानीही तापसीच्या अपोझिट असणार आहे.

 

एक्स्ट्रा शॉट
- कोर्ट रुम सोशल ड्रामा पिंकनंतर तापसी 'मुल्क' या चित्रपटात अजून एका कोर्टरुम ड्रामामध्ये ऋषी कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 27 जुलैला रिलीज होईल.
- आगामी चित्रपट 'वुमनिया' मध्ये तापसी शार्प शूटची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची शूटिंग अक्टोबरपासून सुरु होईल.
- तर हॉकीवर तयार होत असलेल्या 'सूरमा' चित्रपटात तापसी दिसणार आहे. हा चित्रपट 13 जुलैला रिलीज होईल.
 

 

बातम्या आणखी आहेत...