आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai And Abhishek With Daughter Aaradhya Bachchan Family Photo Clicked By Amitabh Bachchan

Photo: अमिताभ बच्चनने क्लिक केला ऐश्वर्याचा परफेक्ट फॅमिली फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या राय सध्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत समर हॉलिडे एन्जॉय करतेय. अभिषेकने पत्नी आणि मुलीसोबतचा व्हॅकेशनचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिघेंही एकमेकांसोबत खुप आनंदी दिसत आहेत. विशेष म्हणजे लेक-सुन आणि नातीचा हा फॅमिली फोटो सासरे अमिताभ बच्चन यांनी क्लिक केला आहे. अभिषेक बच्चनने या फोटोसाठी स्पेशली पापा अभिषेक बच्चन यांना क्रेडिटही दिले आहे. काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि आराध्या पॅरिसमध्ये हॉलिडेवर होत्या तर अभिषेक बच्चन FIFA World Cup 2018 साठी रुसमध्ये होता. आता हे सर्व एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.


ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचा पुर्ण झाले 11 वर्षे
- एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, टोरंटोमध्ये जानेवारी 2007 मध्ये झालेल्या 'गुरु' च्या प्रीमियरनंतर, हॉटेलच्या बालकनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केले होते.
- अभिषेकने सांगितले होते की, "मी ऐश्वर्याला प्रपोज करताना खुप नर्वस होतो. परंतू हिंमत करुन मी तिला मनातील गोष्ट सांगितली होती, ऐशने हो म्हणण्यासाठी एक सेकंडही लावला नाही."
- ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनच्या लग्नाला 11 वर्षे पुर्ण झाले आहेत. दोघांचे लग्न 20 एप्रिल, 2007 ला झाले होते. 
- हे लग्न बच्चन कुटूंबाच्या मुंबई येथील 'प्रतीक्षा' बंगल्यात झाले होते. तर रिसेप्शन हे ताज हॉटेलमध्ये झाले होते. लग्नाच्या वेळी ऐश्वर्या 33 वर्षांची होती तर अभिषेक 31 वर्षांचा होता. 

 

7 वर्षांत एकत्र 6 चित्रपट
- ऐश्वर्या आणि अभिषेकने 7 वर्षात 'ढाई अक्षर प्रेम के' (2000), 'कुछ ना कहो' (2003), 'बंटी और बबली' (2005), 'उमराव जान'(2005), 'धूम-2' (2006), आणि 'गुरु' (2007) या 6 चित्रपटांमध्ये काम केले.
- तर लग्नानंतर दोघांचे 'सरकार राज' (2008) आणि 'रावन' (2010) हे चित्रपट रिलीज झाले. यानंतर ऐश्वर्या 'गुजारिश' (2010) मध्ये दिसली. यानंतर तिने पर्सनल आयुष्यावर लक्ष केंद्रित केले आणि चित्रपटांपासून दूर झाली. 
- यानंतर 2015 मध्ये ऐश्वयाने 'जज्बा' चित्रपटातून कमबॅक केले. नंतर ती 'सरबजीत' (2016) आणि 'ऐ दिल है मुश्किल' (2016) मध्ये दिसली. तर अभिषेक 'रावन'नंतर 'धूम-3', 'हॅपी न्यू ईयर' 'हाउसफुल-3' मध्ये दिसला. परंतू त्याचे चित्रपट बॉक्सऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाही. 
- ऐश्वर्या राय आगामी चित्रपट 'फन्ने खां' मध्ये दिसणार आहे. तर अभिषेक बच्चन सध्या 'मनमर्जिया' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...