आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Photos: 6 वर्षांची असताना हुबेहुब मुलगी आराध्यासारखी दिसायची ऐश्वर्या, तुम्हीही बघा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शालेय दिवसांतील तिचे दोन रेअर फोटोज शेअर केले आहेत. आराध्याच्या वयाची असतानाचे ऐश्वर्याचे हे फोटोज आहेत. ऐश्वर्याने बालपणीचा एक फोटो शेअर करुन ऐश्वर्याने लिहिले, "आराध्याच्या वयात असताना ग्रेड 1 मध्ये." तर आणखी एक फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, "LKG टाइम."  ऐश्वर्याचे बालपणीचे हे फोटोज निरखून पाहिले असता ऐश्वर्या सहा वर्षांची असताना हुबेहुब आराध्यासारखी दिसायची. 


इंस्टाग्रामवर झाले 2.9 मिलियन फॉलोअर्स...
- ऐश्वर्याने याचवर्षी 11 मे रोजी इंस्टाग्रामवर ऑफिशियल एन्ट्री घेतली. अवघ्या दहा दिवसांत तिच्या फॉलोअर्सची संख्या 2.9 मिलियनपर्यंत पोहोचली आहे. ऐश्वर्याने शेअर केलेला पहिला फोटो हा आराध्यासोबतचा होता. त्यानंतर ती जेव्हा आराध्यासोबत कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती, तेथील दोन फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ऐश्वर्याची सहा वर्षीय लेक आराध्या मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, ऐश्वर्याने शेअर केलेले तिचे रेअर फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...