आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याला आली वडिलांची आठवण, आजीच्या कडेवर बसून आराध्याने दिल्या क्यूट पोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : फादर्स डेच्या निमित्ताने बॉलिवूड सेलेब्सने सोशल मीडियावर मॅसेज आणि फोटोज शेअर केले. ऐश्वर्या रायचा एक फोटोही समोर आला आहे. यामध्ये ती आई वृंदा राय आणि आराध्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्याने हातात वडील कृष्णराजचा फोटो घेतला आहे. तर आजीच्या कडेवर बसलेली आराध्या क्यूट एक्सप्रेशन देताना दिसतेय. मागच्या वर्षी मार्च महिन्यात ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले होते. 


ऐश्वर्याला आपल्या आयुष्यात नेहमी प्रायव्हसी हवी असते. परंतू ती सोशल मीडियावर आल्यानंतर तिच्या फॅन्सला तिच्या आयुष्यातील सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. याच कारणामुळे 3 महिन्यात तिच्या फॉलोअर्सची संख्या 3 मिलियनपेक्षा जास्त झाली आहे. ऐश्वर्याने फादर्स डेच्या निमित्ताने आई आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिलेय की,  'SISTERSUNDAY...। ऐशचा आगामी चित्रपट 'फन्ने खां' हा आहे, हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर अतुल मांजरेकर आहेत. 

बातम्या आणखी आहेत...