आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेकला प्रियांकासोबत काम करण्यास ऐश्वर्याने दिला नकार, हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिषेक बच्चन सध्या अनुराग कश्यपचा चित्रपट 'मनमर्जिया' मध्ये काम करतोय. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये तापसी पन्नू आणि विक्की कौशलही आहेत. तर दूसरीकडे फिल्ममेकर सोनाली बोसने अभिषेकला प्रियांका चोप्रासोबत पुढच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. हा चित्रपट दिल्ली बेस्ड मोटिवेशनल स्पीकर आयशा चौधरीच्या आयुष्यावर आहे. परंतू रिपोर्ट्सनुसार अभिषेकने प्रियांकासोबत काम करावे अशी ऐश्वर्याची इच्छा नाही. तिने अभिषेकला या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. तर दूसरीकडे, ऐश्वर्याच्या टीमने स्टेटमेंट प्रसिध्द करुन हे रिपोर्ट चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 

अभिषेकला या चित्रपटात वडिलांची भूमिका ऑफर करण्यात आली होती. तर आयशाची भूमिका 'दबंग'ची अभिनेत्री जायरा वसीम साकारणार आहे. रिपोर्टनुसार ऐश्वर्या मानते की, 'मनमर्जियां'मध्ये अभिषेकला करण्यासाठी खुप काही आहे. परंतू या चित्रपटात सर्व फोकस जायरा वसीमवर राहिल, कारण हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. ऐश्वर्या अभिषेकला म्हणाली आहे की, त्याने एखाद्या चांगल्या प्रोजेक्टची प्रतिक्षा करावी. तर दूसरीकडे बोलले जात आहे की, 'ब्लफमास्टर' चित्रपटात पहिले प्रियांकाऐवजी ऐश्वर्याला कास्ट करण्यात आले होते. परंतू नंतर प्रियांकाने तिला रिप्लेस केले. यामुळे दोन्ही अभिनेत्रींमधील तणाव वाढला आहे. याच कारणांमुळे ऐश्वर्याला वाटते की, अभिषेकने प्रियांकासोबत काम करु नये. नंतर प्रियांका-अभिषेने 'दोस्ताना' चित्रपटात एकत्र काम केले. परंतू त्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नाही. सोनाली बोसने अभिषेक आणि प्रियांकाला आयशा चौधरीच्या पालकांची भूमिका ऑफर केली आहे. 


कोण आहे आयशा चौधरी...
आयशा चौधरी मोटिवेशनल स्पीर होती. वयाच्या 13 व्या वर्षी तिला पल्मोनरी फ्रायब्रोसिस नावाचा आजार झाला. 24 जानेवारी, 2015 ला वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...