आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajay Devgn And Anil Kapoor Have No Time For Anees Bazmees Upcoming Film Saade Sati

Ohh my God... या कारणांमुळे अजय-अनिलच्या 'साडे साती' चित्रपटाला मुहूर्त लागेना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अजय देवगण आणि अनिल कपूर 'वेलकम' फेम डायरेक्टर अनीस बज्मीच्या आगामी 'साडे साती' चित्रपटात झळकणार आहेत. अजयने जेव्हा 'टोटल धमाल' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. तेव्हाच तो या चित्रपटाचे शूटिंगदेखील सुरू करणार होता. चित्रपटाचे शूटिंग यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा प्लान होता. मात्र तसे चिह्न काही दिसत नाहीत. खरं तर, अजय आणि अनिल दोघेही 'टोटल धमाल' नंतर आपल्या दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होतील. त्यामुळे या चित्रपटाचे काम पुढे ढकलू शकते. 


या फिल्म्समध्ये बिझी आहे अनिल कपूर 
'फन्ने खां'चे शूटिंग संपल्यानंतर अनिल 'टोटल धमाल' च्या शूटिंगमध्ये बिझी झाला. याशिवाय त्याच्याकडे ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा यांचा बायोपिकदेखील आहे. या चित्रपटात तो मुलगा हर्षवर्धन कपूरसेाबत दिसणार आहे. 


अजय देवगणचे  बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स 
- यावर्षी अजय देवगणकडे बरेच चित्रपट आहेत. सध्या तो लव्ह रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये बिझी आहे. या शिवाय त्याच्याकडे आणखी 5 चित्रपट आहेत. हे चित्रपट पूर्ण केल्यानंतरच अजय अनीस बज्मीच्या 'साडे साती' साठी वेळ देऊ शकेल. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले आहे. 
- नीरज पांडेच्या चित्रपटात अजय चाणक्यची भूमिका साकारणार आहे. याशिवाय त्याने लेजेंडरी फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांचा बायोपिकदेखील साइन केला आहे. या दोन प्रोजेक्टनंतर अजय आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' मध्ये व्यग्र होणार आहे. यावर 25 सप्टेंबरपासून काम सुरू होईल.  


55 दिवसांचे आहे साडे सातीचे शेड्युल... 
- 'साडे साती'चे शेड्यूल 55 दिवसांचे आहे. यापैकी एका आठवड्याचे शूटिंग महाराष्ट्राच्या वाईमध्ये केले जाईल. लवकरच मेकर्स याविषयी अजयसोबत चर्चा करणार आहेत. यात शेड्यूलविषयी चर्चा होणार आहे. या चित्रपटाची कथा एका अशा माणसावर आधारित आहे, ज्याच्यावर शनीची साडेसाती लागली आहे. 

बातम्या आणखी आहेत...