आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywood Update: 10 वर्षांनंतर 'तानाजी'मध्ये एकत्र दिसू शकतात अजय-काजोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अजय देवगणने गेल्या वर्षी आपला ड्रीम प्रोजेस्ट 'तानाजी: द अनसंग वॉरिअर'ची अनाउंसमेंट केली होती. अजयच्या प्रोडक्शन हाउसमध्ये तयार होणारा हा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात हाय क्वालिटीचे व्हिज्यूअल इफेक्ट्स असतील. यामुळे चित्रपटाचे बजेट जवळपास 150 कोटी रुपये असेल. अजय या चित्रपटात तानाजीच्या प्रमुख भूमिकेत दिसेल. ओम राउत हा चित्रपट डायरेक्ट करतील. चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सेनापती तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असेल. चित्रपटात अजूनही काही मोठे कलाकार असतील. मेकर्सने हे कलाकार अजून फायनल केलेले नाही. या चित्रपटात अजयसोबत काजोल असेल असे बोलले जात आहे. 


पत्नीची भूमिका साकारणार
काजोलने या चित्रपटासाठी होकार दिला तर ती चित्रपटात तानाजी यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. ही एक वॉर फिल्म आहे. यामध्ये सेनापती तानाजी आणि त्याच्या पत्नीचे नातेही दाखवण्यात येईल. काजोलसाठी ही भूमिका थोडी सोपी असेल कारण तिला मराठी भाषा येते. सध्या चित्रपटाते लेआउट, पेपर वर्क, डिझाइनिंग, आणि प्लानिंगचे काम सुरु आहे. मुंबईच्या बाहेर मेकर्सने काही लोकेशन फायनर केले आहे. तिथे सध्या सेट बनवण्याचे काम सुरु आहे. 


स्पोर्ट्स बायोपिकमध्ये अजय नसणार
अजय लवकरच एक स्पोर्ट्स बायोपिकवर काम सुरु करणार आहे. अमित शर्माच्या दिग्दर्शनात तयार होणारा हा चित्रपट बोनी कपूर प्रोड्यूस करतील. चित्रपटाची कथा फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाविषयी बोनी यांनी सांगितले की, 'मला आश्चर्य वाटतेय की, फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांची कथा अजुनपर्यंत लपलेली कशी राहिली. मला या व्यक्तीची कथा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. या भूमिकेसाठी अजय देवगण परफेक्ट आहेत.' या चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी सुरु होण्याची अपेक्षा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...