आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणचा खुलासा, 'माझ्या घरावर पडली होती इन्कम टॅक्सची रेड'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अजय देवगण आपल्या आगामी 'रेड' चित्रपटात इन्कम टॅक्स ऑफिसरची भूमिका करत आहे. चित्रपटात इलियाना डिक्रूज अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. चित्रपट, वैयक्तिक जीवन आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी दोघांशी झालेला हा संवाद 

 

या मुलाखतीत अजय देवगणने आपला अनुभव शेअर केला. तो म्हणाला, ९० च्या दशकातील ही घटना आहे. तेव्हा माझ्या घरावर छापा पडला होता. तेव्हा मी शहरात नव्हतो. शूटिंगसाठी बाहेर गेलो होतो. रेड कमीत कमी दोन दिवस चालली आणि अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अजय लवकरच हिट फ्रंॅचायजी 'सिंघम' आणि 'गोलमाल' च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. याविषयी त्याने सांगितले, 'दोन्ही चित्रपटाच्या पुढच्या भागात मी प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. फक्त आता चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत आहोत. सध्या त्यावरच काम सुरू आहे.'

 

इंडस्ट्रीत स्टार सिस्टिमविषयी अजय म्हणाला, 'खरं तर, आता पहिल्यासारखे स्टार सिस्टिम राहिले नाही. आम्ही लोक खूप भाग्यवान होतो. आमचे चाहते लॉयल होते, आजदेखील आहेत, मात्र आजचे प्रेक्षक खूपच विचार करून चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे खूपच विचार करून बनवावे लागतील.' 


पुढे वाचा, अपकमिंग 'तानाजी' चित्रपटाविषयी काय म्हणाला अजय... 

बातम्या आणखी आहेत...