आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshy Kumar's Kesri Shooting Will Restart At December, Set Got Destroyed Due To Fire In April

डिसेंबरमध्ये पुन्हा सुरु होईल केसरीची शूटिंग, एप्रिलमध्ये जळून खाक झाला होता 18 कोटींचा सेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारचा 'केसरी' चित्रपट येत आहे. हा चित्रपट सारागढीच्या युध्दावर आधारित आहे. डिसेंबरमध्ये चित्रपटाची शुटिंग सुरु होणार आहे. 24 एप्रिलला या चित्रपटाच्या सेटला आग लागली होती. यामुळे सेट उध्वस्त झाला होता. युध्दाच्या सीनच्या शूटिंग दरम्यान किल्ल्याची एक भिंत स्फोट करुन उडवायची होती. परंतू खुप वारे असल्यामुळे आग संपुर्ण सेटला लागली. सूत्रांनुसार ज्या दिवशी सेटला आग लागली तेव्हा फक्त 10 दिवसांची शूटिंग बाकी राहिली होती. या घटनेमुळे मेकर्सला 18 कोटींचे नुकसान झाले होते. 


2019 होईल रिलीज
- गोरेगांवमध्ये गुलिस्तानच्या किल्ल्याचा सेट बनवण्यात आला आहे. येथे अक्षय चित्रपटाच्या खास सीक्वेंस शूट करणार आहे. केसरी हा चित्रपट 2019 मध्ये होळीच्या काळात रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. 
- 'केसरी'चे डायरेक्शन अनुराग सिंह करत आहेत. प्रोड्यूसर करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'च्या बॅनर खाली हा चित्रपट तयार होतोय. या चित्रपटात अक्षयसोबतच परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.


बॅटल ऑफ सारागढी हा मैलाचा दगड मानला जातो
- भारतीय सैन्याच्या इतिहासात बॅटल ऑफ सारागढी हा मैलाचा दगड मानला जातो. 12 सप्टेंबर 1897 मध्ये लढलेले हे 36 वे युध्द होते. शिख बटालियनच्या 21 सैनिकांनी आणि 10 हजार अफगान्यांनमध्ये हे युध्द झाले होते.
- बॅटलमध्ये शहीद झालेल्या सर्व भारतीय सैनिकांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले होते.

 

अक्षय करतो हाउसफुल-4 ची शूटिंग
- केसरीची शूटिंग बंद झाल्यानंतर अक्षय सध्या लंडनमध्ये साजित खानच्या 'हाउसफुल 4' चित्रपटाची शूटिंग करतोय. यानंतर राजस्थानमध्ये चित्रपटाची शूटिंग होईल.
- यावेळी अक्षय हॉकी वर तयार होणारा चित्रपट गोल्डच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होईल. गोल्ड हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होईल. 
 

बातम्या आणखी आहेत...