आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्रीने लावला लैंगिक शोषणाचा आरोप, अॅक्टरने सोडले मौन, दिले हे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'भाग मिल्खा भाग'(2013) ची अभिनेत्री मीशा शफीने पाकिस्तानी अॅक्टर आणि सिंगर अली जफरवर सेक्शुअल हरॅशमेंटचे आरोप लावले आहे. यावर अलीने आता मौन सौडलेय. अली म्हणाला की, मला #Metoo कॅम्पेनविषयी माहिती आहे आणि याला सपोर्टही करतो. हे कँपेन कशासाठी आहे हे त्यांना माहिती आहे का? अली म्हणाला "मी एक मुलगी आणि मुलाचा बाप आहे. एका बायकोचा नवरा आणि एका आईचा मुलगा आहे. मी एक असा व्यक्ती आहे जो अडचणीच्या काळात हजारावेळा कुटूंब, कलीग्स आणि मित्रांसाठी उभा झालो आहे. आजही मी तेच करेल. काहीच लपलेले नाही. गप्प राहणे हे ऑप्शन नाही"


अली म्हणाला - मी मीशाला कोर्टात घेऊन जाईल
- अलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या ओपन लेटरमध्ये लिहिल आहे, "मिस शफीने माझ्यावर आरोप लावले आहे. मी ते फेटाळून लावतो. हे प्रकरण मी प्रोफेशनली घेईल. मी मिशाला कोर्टात घेऊन जाईल. सोशल मीडियावर असे आरोप लावून मी कुटूंब, इंडस्ट्री आणि आपल्या फॅन्सचा अपमान करणार नाही. मला वाटते की, सत्य नेहमी जिंकते."

 

अलीच्या सपोर्टमध्ये सोशल मीडिया यूजर्स
- अलीच्या ओपन लेटरवर सोशल मीडिया यूजर्सने कमेंटही केले आहेत. जास्तीत जास्त यूजर्स अलीच्या सपोर्टमध्ये दिसले. एका यूजरने लिहिले, "अली भाई मी तुच्यासोबत आहे. मीशा शफीने एक वाईट पध्दतीने स्टंट केला आहे. तिचा चित्रपट येणार आहे, यामुळे तिने तुला वाईट ठरवण्यासाठी हा स्टंट निवडला आहे." तर एका यूजरने लिहिले की, "तिला अटेंशन हवे आहे. त्याने फक्त प्रेमाने पाहिले असेल, तिने हरॅशमेंटची केस दाखल केली." एका यूजरने मीशाला खोटारडी आणि चोर म्हटले आहे. "मीशा शफी खोटी आहे, तर भूतकाळात ती चोर होती. तिच्याकडून काय अपेक्षा करता येईल. मी तुझ्यासोबत आहे भाई" 
- काही सोशल मीडिया यूजर्सने अलीवर निशाना साधला आहे. यूजरने लिहिले की,"मर्दजात, दूसरी #त्तीजात होती है. हमारे इमाम भी अब पहले जैसे नहीं रहे. कुछ भी हो सकता है. आप कल्पना भी नहीं कर सकते. सच्चाई क्या है...अल्लाह जाने" तर एका यूजरने लिहिले की, मीशा का स्वतःला बदनाम करण्यासाठी असे आरोप लावेल.

 

मीशाने सांगितले असे
- मीशाने ट्वीटवर माहिती शेअर करत सांगितले की, अली जफर(37) ने एकदा नाही. तर अनेक वेळा माझे लैंगिक शोषण केले. 36 वर्षांच्या मीशानुसार, ती इंडस्ट्रीमध्ये नवीन आल्यानंतर तिच्यासोबत असे झाले नाही. हे सर्व तिच्यासोबत इंडस्ट्रीत सेटल झाल्यानंतर आणि लग्नानंतर झाले.


तेव्हा दोन मुलांची आई होती मीशा

मीशाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, अलीने तिचे शोषण केले तेव्हा ती दोन मुलांची आई होती. तिच्या आणि कुटूंबासाठी हा काळ खुप कठीण होता. मीरानुसार ती अलीला दिर्घकाळापासून ओळखते. मीशाने पोस्टच्या शेवटी लिहिले की, "आपल्याकडे आपला आवाज आणि वेळ याचा वापर करते." 2008 मध्ये मीशा शफीचे लग्न पाकिस्तानी गिटारिस्ट मोहम्मद रहमानसोबत झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता अली जफर आणि मीशा शफीची सोशल मीडिया पोस्ट्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...