आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासाठी या अॅक्ट्रेसने 30 वर्षे सहन केला पतीचा मार, सुपरहिट फिल्मने केली होती बॉलिवूड एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रती अग्निहोत्री. - Divya Marathi
रती अग्निहोत्री.

मुंबई - अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेअर केलेली रती अग्निहोत्री 57 वर्षांची झाली आहे. 10 डिसेंबर1960 ला बरेलीमध्ये जन्मलेल्या रतीचे बालपण चेन्नईत गेले होते. रती अग्नीहोत्री अवघ्या 10 वर्षांची होती तेव्हा मॉडेलिंग सुरु केले होते. रतीला अॅक्ट्रेस करणाचे श्रेय तामिळ डायरेक्टर भारती राजा यांना आहे. त्यांनी 16 वर्षांच्या रती अग्निहोत्रीला 'पुदिया वरपुकल' मध्ये संधी दिली होती. रतीने एका मुलाखतीत सांगितले होते, की मी मुलगा तनुजसाठी 30 वर्षे पतीचे अत्याचार सहन करत होते. 

 

पतीवर केला होता चाकूने मारण्याचा आरोप 
- रती अग्निहोत्रीने आर्किटेक्ट पती अनिल वीरवाणीवर 2015 मध्ये चाकूने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. याआधीही रतीने पतीविरोधात कौटूंबिक अत्याचार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी अशा केसेस केल्या होत्या. 
- 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रतीने सांगितले होते, की बऱ्याच वर्षांपासून पती अनिल माझ्यावर अत्याचार करत आहे. मात्र आता त्याने सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत. मी त्याचे सर्व अत्याचार फक्त मुलगा तनुजसाठी सहन करत राहिले, कारण मला मुलाला आमच्या भांडणामध्ये येऊ द्यायचे नव्हते. 

 

1985 मध्ये केले होते रतीन लग्न
- 9 फेब्रुवारी 1985 मध्ये रतीन बिझनेसमॅन अनिल वीरवाणीसोबत लग्न केले होते. 
- लग्नाच्या 30 वर्षानंतर 2015 मध्ये दोघे वेगळे झाले होते. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव तनुज वीरवाणी. तनुजचा जन्म 1986ला झाला होता. 

 

रतीने 'एक दूजे के लिए'  मधून केली बॉलिवूड एंट्री 
- साऊथमध्ये अनेक फिल्म केल्यानंतर रती अग्निहोत्रीने 'एक दूजे के लिए' फिल्मने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ही फिल्म सुपरहिट ठरली होती. यानंतर फर्ज और कानून, अमिताभ बच्चन यांच्यासोबत कुली मध्ये काम केले. 

 

काजोलच्या ग्लॅमरस आईच्या रोलने केले पुनरागमन
- 16 वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर रती अग्निहोत्रीने 2001 मध्ये 'कुछ खट्टी कुछ मीठी' या चित्रपटात काजोलच्या ग्लॅमरस आईच्या भूमिकेने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले होते.
यानंतर यादे, देव मध्येही रतीने काम केले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, एक दुजे के लिये मधील वासू-सपना...

बातम्या आणखी आहेत...