आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी श्वेतासोबतचा फोटो अमिताभ यांनी केला पोस्ट, म्हणाले- मुली सर्वात BEST

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ते मुलगी श्वेता नंदासोबत 'जलसा' बंगल्याबाहेर बोलताना दिसत आहेत. 75  वर्षांच्या अमिताभ यांनी या फोटोसोबत एक भावनिक मेसेजही शेअर केला आहे. बिग बींनी लिहिले आहे, की  "Daughters are the best." बिग बींनी या फोटोंचा उल्लेख त्यांच्या ब्लॉगमध्येही केला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या फॅमिलीचे फोटो शेअर करण्याची ही काही पहिली वेळ नाही, याआधीही त्यांनी फॅमिलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

गेल्या महिन्यात पोस्ट केला होता लव्हली फोटो... 
- गेल्या महिन्यात अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेलीसोबतचा एक लव्हली फोटो पोस्ट केला होता. त्यासोबत लिहिले होते, "Mother, daughter, granddaughter. DAUGHTERS ARE THE BEST!!!"
- अमिताभ सध्या  'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या फिल्ममध्ये बिग बींशिवाय आमिर खान, कतरीना कैफ आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत. 
- काही दिवसांपूर्वीच या फिल्मच्या सेटवरील अमिताभ बच्चन यांचा एक फोटो लीक झाला होता. यामध्ये ते एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत होते. डोक्यावर फेटा आणि पाठीवर तलवार लावलेली असे वॉरियरच्या रुपात अमिताभ दिसत होते. 
- विजय कृष्ण दिग्दर्शित करत असलेली 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' हॉलिवूड फिल्म 'पाइरेट्स ऑफ कॅरेबियन' पासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. वास्तविक या अफवांवर आमिर खानने एका मुलाखतीत स्पष्ट केले की ही एक अॅक्शन-अॅडव्हेंचर फिल्म असून या फिल्मची कथा फार वेगळी आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा आमिताभ यांच्या काही पोस्ट्स..

बातम्या आणखी आहेत...