आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये बिग बींना झाली 49 वर्षे, आजच साइन केला होता पहिला सिनेमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये 49 वर्ष पुर्ण झाले आहेत. बिग बींनी 15 फेब्रुवरी, 1969 मध्ये आपल्या करियरचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' साइन केला होता. एक मोठा काळ लोटला आहे. 

 

पहिल्या चित्रपटात अमिताभ हे कवि बनले होते
- सात हिंदुस्तानी चित्रपटात अमिताभ यांनी अनवर अली नावाच्या एका कविची भूमिका साकारली होती.
- खरेतर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जास्त यश मिळाले नाही. चित्रपटात त्यांच्यासोबत अत्पल दत्त, जलाल आगा, अनवर अली आणि मधु होते.
- हा चित्रपट 7 नोव्हेंबर, 1969 मध्ये रिलीज झाला होता.


या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांना ओळख मिळाली होती
- अमिताभ यांनी 'सात हिंदुस्तानी' चित्रपटातून करियरची सुरुवात झाली. परंतू त्यांना खरी ओळख 4 वर्षांनंतर आलेल्या प्रकाश मेहरा यांच्या 'जंजीर' चित्रपटातून मिळाली.
- जंजीरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच प्राण, जया भादुडी, ओमप्रकाश आणि अजीत यांनी काम केले होते. चित्रपटात अमिताभ यांनी इंस्पेक्टरची विजय खन्नाची भूमिका साकारली होती.
बिग बींमुळे चित्रपट चालण्याची गॅरंटी होती
- अमिताभ यांचा उत्कृष्ट अभिनय आणि पर्सनॅलिटी चांगली होती. याचमुळे चित्रपट त्यांच्या गॅरंटीवर चालत होता.
- याच कारणांमुळे अमिताभ यांनी शोले, दीवार, शहंशाह, मर्द, कुलीसारख्या सुपरहिट चित्रपट एकामागून एक दिले.
- यासोबतच दूस-यावेळीही ते यशस्वी ठरले, त्यांनी चीनी कम, निशब्द, ब्लॅक, पीकू आणि पिंकसारख्या चित्रपटातून चांगले चित्रपट दिले.
27 वर्षांनंतर या चित्रपटात दिसतील ऋषि कपूरसोबत
अमिताभ बच्चन लवकरच '102 नॉट आउट' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत ऋषि कपूरही असतील. दोघं जवळपास 27 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यापुर्वी ही जोडी 1991 मध्ये आलेल्या 'अजूबा' चित्रपटात दिसली होती. '102 नॉट आउट' मध्ये अमिताभ आणि ऋषि बाप-लेकाच्या जोडीमध्ये दिसतील.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, अमिताभ बच्चन यांचे काही Rare Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...