आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी सर्वांसमोर करुन दिली चुकीची जाणिव, अशी होती आलियाची रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भट सध्या अमिताभ बच्चन आणि रणवीर कपूरसोबत डायरेक्टर अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची शूटिंग करत आहे. बिग बीसोबत शूटिंगचा अनुभव शेअर करण्यासाठी आलियाने एक ट्वीट केले. परंतू त्यामध्ये एक चुक राहिली. अमिताभ बच्चन यांनी ती चुक पकडली, यासोबतच त्या ट्वीटचा रिप्लाय करुन तिला चुकीची जाणिव करुन दिली.


आलियाने काय लिहिले
- आलियाने ट्वीट करुन लिहिले होते की, "Working with AB has been supreme greatness! Today @SrBachchan packed up an hour before the actual pack up but he stayed back on set just to give ques! I can’t begin to explain the amount of things I am learning on set just by watching him!!!!(अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे खुप मोठी गोष्ट आहे. आज अॅक्चुअल पॅकअपच्या एक तासापुर्वी अमिताभ यांनी आपले पॅकअप केले होते. परंतू आमच्यासाठी ते एक तास बसून राहिले. त्यांना पाहून मी काय काय शिकते हे तुम्ही समजावू शकत नाही.) 


असा होता बिग बींचा रिप्लाय

- आलियाच्या ट्वीटवर बिग बीने लगेच रिप्लाय दिला. ते म्हणाले "Yo .. Alia , you are the best .. thank you for the generosity .. and .. err .. its 'cues' not 'ques' .. .. you are just tooooo cute !!" (यो आलिया तु खुप चांगली आहेस. उदारतेसाठी धन्यवाद आणि एक चुक आहे... ते  Cues असते Ques नाही.)

 

आलिया म्हणाली - अरे देवा... यानंतर नाही
- अमिताभने आलियाला तिच्या चुकीची जाणिव करुन दिली तेव्हा तिने रिप्लाय दिला, अरे देवा...यानंतर नाही..." यापुर्वीही आलियाच्या चुका आणि सामान्य ज्ञानामुळे तिची खिल्ली उडवली गेली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...