आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Get Angry See Children Abhishek Bachchan Shweta Bachchan Busy In Mobile

Big Bने घेतली कुटूंबाची शाळा, म्हणाले - जे कुटूंब एकत्र बसून मोबाइल वापरते, ते एकत्र राहते?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : तुम्ही कुटूंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी बाहेर पडला आहात. अशा वेळी कुटूंबातील सदस्य एन्जॉय करण्याव्यतिरिक्त जर मोबाइलमध्ये व्यस्त असले तर कसे वाटेल? सहाजिक वाईट वाटेल. अमिताभ बच्चन यांच्यासोबतही असेच काहीसे झाले. सोमवारी ते कुटूंबासोबत रुसमध्ये पोहोचले होते. त्यांच्यासोबत मुलगी श्वेता बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, नात नव्या नवेली आणि नातू अगस्त्या होते. यावेळी एकमेकांसोबत एन्जॉय करण्याव्यतिरिक्त ते आपापल्या मोबाइलमध्ये व्यस्त दिसले. हे पाहून अमिताभ यांना विचित्र वाटले. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांची शाळा घेतली. "जे कुटूंब एकत्र मोबाइलचा वापर करते ते एकत्र असते" अमिताभ यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या ते सोशल मीडियावर आपल्या अंदाजात व्यक्त करत असतात. त्यांनी यावेळी आपल्या कुटूंबाची शाळा घेतली आहे.
- अमिताभ आणि अभिषेक यांना फुटबॉल आवडते. याच कारणांमुळे ते फुटबॉल वर्ल्ड कप फायनल मॅच पाहण्यासाठी रुसमध्ये पोहोचले आहेत. 15 जुलैला टूर्नामेंट फायनल मॅच आहे. या ट्रिपवर त्यांच्यासोबत जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या नाही.
- अमिताभ यांच्या वर्क फ्रेंटविषयी बोलायचे झाले तर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'ब्रम्हास्त्र' हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत.
- अभिषेक बच्चनच्या वर्क फ्रेंटविषयी बोलायचे झाले तर याच वर्षी त्याचा 'मनमर्जिया' चित्रपट रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...