Home »News» Amitabh Bachchan Has Gone For A Check Up To Lilavati Hospital

स्पाइन प्रॉब्लेममुळे रुग्णालयात दाखल झाले होते अमिताभ, उपचारानंतर उशीरा रात्री मिळाली सुटी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2018, 12:17 PM IST


मुंबईः महानायक अमिताभ बच्चन यांना काल (शुक्रवार) अचानक मानेचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रेग्युलर चेकअपनंतर अमिताभ यांना काल रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी रात्री ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाचे शुटिंग गोरेगाव फिल्मसिटीत सुरु होते. ते उशिरापर्यंत चालू असल्याने त्याचाच त्रास जाणवत असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बिग बी शनिवारी एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. पण प्रकृती अस्वस्थामुळे हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. लीलावती रुग्णायातून बाहेर पडताना बिग बींनी त्यांचा चेहरा एका वुलन कॅपने झाकला होता. त्यांचा मुलगा अभिषेक यावेळी त्यांच्यासोबत होता.


अमिताभ बच्चन यांना 2012 मध्येही शस्त्रक्रियेसाठी 12 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बच्चन यांना यकृतासंबंधीचा त्रास आहे. त्याचबरोबर 2005 मध्येही त्यांच्या पोटात प्रचंड दुखत असल्याने त्यांच्यावर आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरु आहे. 7 नोव्हेंबर 2018 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

पुढे बघा, रुग्णालयातून बाहेर पडताना असतानाची बिग बींची छायाचित्रे...

Next Article

Recommended