आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कोर ट्रेंड्स इंडिया फेसबुक चार्ट्सवर नंबर वन बनलेल्या बिग बींनी ट्विटरला मारला टोमणा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानायक अमिताभ बच्चन फेसबुकवर 30 दशलक्ष फोलोवर्ससह भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले 'मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक' बनले आहेत. बिग बींनी स्कोअर ट्रेड्स इंडियाने ट्विटवरून ही माहिती दिली आहे.

 

बिग बींच्या एका चाहतीने स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टची आकडेवारी ट्विट केली होती. अमिताभ बच्चन ह्यांनी ती रिट्विट करत ट्विटरला शाल जोडीतला आहेर देत म्हटले आहे, "होय, ट्विटर आता तुम्ही ह्याला स्विकृती द्याल का."

 

रिपोर्ट्सनुसार, ट्विटरने अचानक बिग बीच्या फॉलोवर्सची संख्या 60,000 पर्यंत कमी केली होती. त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते आणि शाहरुख खान 3,29,41,837 फॉलोवर्ससह नंबर एक स्थानी पोहोचले होते. त्यामुळे  अमिताभ बच्चन नाराज झाले होते आणि त्यांनी ट्विटर सोडण्याची धमकी दिली होती.

 

स्कोर ट्रेंड्सच्या आकडेवारीनूसार, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे, की अमिताभ बच्चन 100 अंकासह नंबर वन स्थानी आहेत. तर शाहरूख खान 68 अंकांसह तिस-या स्थानावर आहे. सुपरस्टार सलमान खान 95 स्कोरसह दूस-या स्थानी आहे. युवाईच्या गळ्यातला ताईत रणवीर सिंह 52 अंकांसह चौथ्या स्थानावर आणि सर्वाधिक बँकेबल एक्टर समजला जाणारा अक्षय कुमार 49 स्कोरसह पाचव्या स्थानी आहे.

 

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “बिग बींच्या वाढत्या लोकप्रियतेनेच त्यांना फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग भारतीय सेलिब्रिटी बनवले. बच्चनसरांच्या प्रत्येक पोस्टवर आणि ऑफिशिअल पेजवर 100 टक्के एंगेजमेंट दिसून आलीय.जी निश्चितच एक मोठी गोष्ट आहे. “

 

पुढे वाचा, अमिताभ बच्चन यांचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...