आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहसाने महिला कणखरपणे पुढे जाऊ शकतात, बिग बींनी लिहिले महिलांना खुले पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बिग बींनी  महिलांना खुले पत्र लिहिले. ते म्हणतात, 'एक काळ असा होता जेव्हा महिलांना स्वत:ची ओळख नव्हती. आपल्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाचा आधार त्यांना घ्यावा लागत असे. आज मात्र काळ बदलला आहे. लोकांची मानसिकताही बदलत चालली आहे. महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. पुरुषी मानसिकतेच्या जगात महिलांना त्यांचे स्थान मिळणे तसे पाहिले तर कठीणच आहे. मात्र तरीही आपल्या समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या कष्टाच्या, साहसाच्या आिण आत्मविश्वासाच्या जोरावर स्वत:ला वेगळे सिद्ध केले आहे. मुळात ज्या महिलेला या पुरुषप्रधान संस्कृतीत आपले वेगळेपण सिद्ध करायचे आहे तिच्यात प्रचंड आत्मविश्वास आणि साहस हवे. सशक्तीकरणाच्या या जगात तिने आत्मविश्वासाने पुढे जायला हवे.' 

 

अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटले,  मी ही कथा तुम्हाला यासाठी सांगितली की, महिला कोठेही कमी नाहीत हे मला तुम्हाला सांगायचे आहे. आत्मविश्वास असेल तर कोणतीही महिला पुरूषप्रधान संस्कृतीत यश मिळवू शकते. फक्त सकारात्मक दृषटीकोन असायला हवा. माझ्या घरी बायको, मुलगी, सून आणि नातवंडे आहेत. माझे त्या सर्वांना सांगणे असते की, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो स्वत: विचार करून घ्या. कुणाच्याही दबावात घेऊ नका. स्वत:चे अस्तित्व तुम्ही कायम ठेवा. 


पुढे वाचा, बिग बींनी सांगितला एक खास किस्सा... 

बातम्या आणखी आहेत...