आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठुआ रेप केसवर बिग बींच्या वक्तव्यावर भडकले यूजर, म्हणाले हा आहे बॉलिवूडचा खरा चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन सध्या आगामी चित्रपट ''102 नॉट आउट च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात त्यांच्यासोबत ऋषी कपूर आहेत. गुरुवारी या चित्रपटाचे एक गाणे लॉन्च करण्यात आले. यावेळी अमिताभ बच्चन कठुआ बलात्कार प्रकरणी बोलले. त्यांच्या वक्तव्यावर यूजर भडकले आहेत. काही यूजर बिग बींच्या वक्तव्यावर म्हणाले की, "जेव्हा 'पिंक' चित्रपट आला होता. तेव्हा तर याविषयी खुप बोलत होते. पण आता बोलायचे नाही. हाच आहे बॉलिवूडचा खरा चेहरा" खरेतर अमिताभ बच्चन बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला सपोर्ट करतात आणि याची कँपेनिंग करत असतात. अशावेळी त्यांचे असे वक्तव्य ऐकून यूजर भडकले.


काय म्हणाले बिग बी 
- अमिताभ बच्चन यांनी कठुआ गँगरेपवर नाराजी व्यक्त केली होती.
- जेव्हा त्यांना याविषीय प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, याविषयी बोलायलाही लाज वाटते.
- ते म्हणाले की, अशा प्रकारच्या अपराधांवर बोलणेही खुप भितीदायक आहे.
- बिग बीचे उत्तर ऐकल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने त्यांना टोमणे मारणे सुरु केले.
- अनेक लोक त्यांना म्हणाले की, 'पिंक' सारखे चित्रपट तयार करतात. परंतू अशा प्रकरणी प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते.
- अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट '102 नॉट आउट' 4 मेला रिलीज होणार आहे.
- चित्रपटाचे डायरेक्टर उमेश शुक्ला आहेत.
- यामध्ये अमिताभ, ऋषी कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा यूजरने केलेली कमेंट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...