आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत सुधारणा, म्हणाले, \'चलो इसी बहाने, अपनों का पता तो चला\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त सोमवारी आले होते. बिग बी सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूर येथे आहेत. येथेच चित्रीकरणादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने बिग बींवर उपचार केल्याची माहिती समोर आली. आता बिग बींच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. स्वतः बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून याविषयी सांगितले आहे. आज सकाळी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये बिग बी म्हणाले, "कुछ कष्ट बढ़ा, चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा; इलाज प्रबल, स्वस्थ हुए नवल, चलो इसी बहाने , अपनों का पता तो चला"  

 

जया बच्चन यांनीही दिला दुजोरा... 
ज्येष्ठ अभिनेत्री आणि बिग बींच्या पत्नी जया बच्चन यांनीही बिग बींची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगत अनेकांनाच दिलासा दिला. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. ‘अमितजींच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. ते बरे आहेत. त्यांना पाठ आणि मानदुखींमुळे हा त्रास झाला होता. चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेल्या कपड्यांचे वजन जास्त असल्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. इतर कोणतेही गंभीर कारण नसून, त्यांची प्रकृती उत्तम आहे’, असं त्या म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...