Home »News» Amrish Puris 13th Death Anniversary Some Facts

Death Anni: 13 वर्षांपूर्वी 'मोगॅम्बो' झाले होते 'खामोश', अभिनयापूर्वी काढायचे लोकांच्या पॉलिसी

दिव्य मराठी वेब टीम | Jan 12, 2018, 00:51 AM IST

  • मुलांसोबत मस्तीच्या मूडमध्ये अमरीश पूरी, उजवीकडे पत्नी उर्मिला, मुलगा राजीव आणि मुलगी नम्रतासोबत.

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अमरीश पुरींच्या निधनाला आज 13 वर्षे झाली. 'मि. इंडिया'मधील 'मोगॅम्बो' असो, वा 'घातक'मधील 'शंभू नाथ' किंवा 'डीडीएलजी'मधील 'बाबूजी'... अमरीश पुरींनी प्रत्येक भूमिका अजरामर केली. पंजाबमधील नवांशहर येथे 22 जून 1932 रोजी अमरीश पुरींचा जन्म झाला. 12 जानेवारी 2005ला मुंबईमध्ये त्यांचं निधन झाले. 1967 पासून सुरु झालेला सिनेप्रवाश शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत सुरु राहिला.

मराठीतून केली होती अभिनयाला सुरुवात..

खूप कमी लोकांना माहिती आहे की, अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. 1967 सालच्या 'शांतता! कोर्ट चालू आहे' या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अमरिश पुरी यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी...

Next Article

Recommended