आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anupam Kher Introduced Aahana Kumra As Priyanka Gandhi In Movie Theaccidentalprimeminister

The accidental prime minister: मनमोहन सिंग यांना भेटलात, आता भेटा राहुल गांधी आणि प्रियांका गांधीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून ते भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लूकवरुन काही दिवसांपूर्वीच पडदा उचलण्यात आला होता, ज्यानंतर आता खुद्द अनुपम खेर यांनी या चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या भूमिकांवरुन पडदा उचलला आहे.


अर्जुन माथूर आणि आहाना कुम्रा यांच्या भूमिकांवरुन त्यांनी पडदा उचलला असून, ते दोघंही यात अनुक्रमे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. प्रियांका गांधींच्या भूमिकेत दिसणारी आहाना कुम्रा अनेकांचच लक्ष वेधत आहे. यापूर्वी अनुपम खेर यांनी ट्वीट करुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नीची भूमिका वठवणा-या अभिनेत्रीचे नाव जाहिर केले होते. त्यांनी ट्वीट केले होते,  “देशाचे माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौरच्या रुपात दिव्यी सेठ शाह आपल्या भेटीला येत आहेत.” 

 

संजय बारूंच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट...  
काही काळासाठी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. 2014 साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केलं होतं. यावर्षी 21 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.  


पुढे वाचा, कोण आहे आहाना कुम्रा... 

बातम्या आणखी आहेत...